बुधवार, २८ नोव्हेंबर, २०१२

नामदार मा. श्री. दिलीपरावजी वळसे पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा......

            आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते व महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष मा. नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या ५६ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पिंपळगाव मधील कार्यकर्त्यांनी मोठ मोठे फलक लावून शुभेच्छा दिल्या. तर मा. जि. प. सदस्य मा. मथाजी पोखरकर यांनी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रसिध्द समाजप्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख यांचे कीर्तन आयोजित केले. दरम्यान लकी ड्रॉ पद्धतीने विविध बक्षिषे वाटण्यात आली. त्यात प्रामुख्याने
५६ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वामनराव पै. यांचे विद्यार्थी मार्गदर्शन पुस्तक
५६ महिलांना सुंदर देवयानी पद्धतीच्या साड्या 
५६ जेष्ठ नागरिकांना छत्री वाटप.
५६ ग्रामस्थांना वामनराव पै. यांचे दोन मार्गदर्शनपर ग्रंथ

     त्याच बरोबर सदस्यांनी मा. प्रभाकर बांगर यांच्या नेतृत्वाखाली रक्तदानाचे आयोजन केले होते. त्यात पिंपळगाव ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
 


पिंपळगावमध्ये नामसंकीर्तन महायज्ञ सोहळ्याची सुरुवात...

                पिंपळगावामध्ये होणारा पांडुरंगाचा काकडा प्रसिध्द आहे. कोजागिरी पोर्णिमेनंतर या उत्सवास प्रारंभ होतो.तब्बल एक महिना ग्रामस्थांच्या हस्ते पांडुरंगाची महापुजा केली जाते. महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांची किर्तने होतात. ज्ञानेश्वरी पारायण सोहळा केला जातो. हरिपाठाचे स्तवन केले जाते.एकंदरित दिपावलीच्या काळात कार्तिक महिन्यात आयोजित केलेला हा काकडा भक्तिमय वातावरण निर्माण करतो.
                काकडयाची सांगता होण्याच्या शेवटच्या दोन दिवसात संगीत भजन स्पर्धेचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रातील नामवंत भजनी मंडळे सहभागी होतात. काल्याच्या दिवशी किर्तन होते. नंतर गावाला वाद्यांच्या गजरात प्रदिक्षणा घतली जाते व महाप्रसादाचा लाभ घेवुन काकडयाची सांगता होते.
नामसंकीर्तन महायज्ञ सोहळ्याबाबत सांगण्यासारखे बरच काही आहे. त्याची काही निवडक छायाचित्रे आपणासाठी सादर करीत आहे.




मंगळवार, २७ नोव्हेंबर, २०१२

पिंपळगाव मधील नवरात्रोत्सव साजरा झाला उत्साहात....

      ज्या प्रमाणे गणेशोत्सव पिंपळगावमध्ये उत्साहात साजरे केले जाते अगदी त्याच प्रमाणे नवरात्रामध्येही सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्राचीही बरीच मंडळे पिंपळगाव मध्ये आहेत. त्यात प्रामुख्याने सांगायची झालीच तर साई नवरात्रोत्सव (गव्हाळी मळा), पीरसाहेब नवरात्रोत्सव ( पाटलाचा मळा,वाडा), न्यू-मुक्तादेवी गणेश मंडळ (पिंपळगाव गावठाण, श्रीराम चौक) आदी प्रमुख मंडळांनी नवरात्रोत्सवामध्ये विशेष कामगिरी बजावली.
             नवरात्रोत्सवामध्ये सर्वात प्रसिद्ध बाब म्हणजे दांडिया. तब्बल ११ ते १२ वाजेपर्यंत तुफान गर्दीमध्ये दांडिया खेळली जाते. त्याची काही क्षणचित्रे येथे नमूद करीत आहे.


   

सोमवार, २९ ऑक्टोबर, २०१२

राजा शिवछत्रपती तरुण मंडळाने आयोजित केलेल्या विविध स्पर्धा......

गेली ३७ वर्ष समाजसेवेचा वसा घेतलेले
राजा शिवछत्रपती तरुण मंडळ
पिंपळगाव (खडकी), ता. आंबेगाव , जिल्हा : पुणे.
सालाबाद प्रमाणे याही वर्षी मंडळाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्या स्पर्धा खालीलप्रमाणे.
चम...चा-लिंबू स्पर्धा
पोत्यात पाय घालून पळणे स्पर्धा
उडी मारून केळ तोडणे स्पर्धा
ऐश्वर्याला डोळे बांधून टिकली लावणे.
चित्रकला स्पर्धा
रांगोळी स्पर्धा
...निबंध स्पर्धा
संगीत खुर्ची स्पर्धा
या स्पर्धांची काही क्षणचित्रे.
शिवाय फक्त शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा मर्यादित न ठेवता महिला भगिनींसाठी ही भव्य स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्या स्पर्धा खालीलप्रमाणे.
स्त्री – भ्रृण हत्तेवर जनजागृती चित्रपट
सामान्यज्ञान स्पर्धा
उखाणे स्पर्धा
संगीत खुर्ची स्पर्धा
बास्केटबॉल स्पर्धा
या स्पर्धांची काही क्षणचित्रे.


गणेश विसर्जन
मंडळाने या वर्षी विसर्जन साध्या पद्धतीने करायचे ठरविले म्हणजे कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता “गणपती बाप्पा मोरया”च्या गजरात गणरायाचे विसर्जन केले. शिवाय दिवसभरामध्ये नदीमध्ये निर्माल्य टाकल्यामुळे नदीचे प्रदूषण होऊ नये हा दुष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन नदीमध्ये टाकले जाणारे निर्माल्य एका गाडीमध्ये जमा करण्याचे ठरविले. त्यासाठी ग्रामपंचायतीकडून घंटागाडी मागविली व गावातील सर्व मंडळांना विनंती करून निर्माल्य नदीमध्ये न टाकता घंटागाडी मध्ये टाकायला सांगितले. आमच्या या उपक्रमाला सर्व गणेश भक्तांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्या वेळेस घेतलेली काही क्षणचित्रे.

मंडळातील कार्यकारणी
अनिल शंकरराव चव्हाण, (संस्थापक)
वैभव शंकरराव भागवत
निरंजन लक्ष्मण बांगर
आदिनाथ विश्वनाथ साळुंखे
गणेश पंढरीनाथ बांगर
सचिन सीताराम बिचवे
फिरोज दाऊदभाई इनामदार
विपुल गोसावी पुरी
वैभव रोहिदास पोखरकर
संदीप वसंत दळे
ओमकार कोंडीभाऊ अरगडे
अल्ताफ रशिदभाई इनामदार
विशाल गणपत पोखरकर
आकाश लक्ष्मण थोरात
मंडळाचे प्रेरणास्थान
मथाजी पांडुरंग पोखरकर
(जि.प.सदस्य, पुणे.)

पिंपळगाव खडकीमधील गणेशोत्सव धामधुमीत साजरे.....

                         
                            आपल्या सर्वांचे आराध्यदैवत ज्यांना देवांमध्ये अग्रगण्य स्थान आहे. असे आपले गणपतीबाप्पा मोरया यांच्या उत्सवाच्या वेळेस पूर्ण भारतभर धामधूम असते. पिंपळगाव (ख.) मध्येही मोठ्या उत्सवात गणेशोत्सव साजरा केला गेला. गावात आजतागायत तब्बल १५ ते २० मंडळे स्थापन झालेली आहेत. सर्वच मंडळाची नावे देणे शक्य नाही तर नावजलेल्या मंडळांमध्ये शिवाजी चौकातील मुक्तादेवी गणेश मित्र मंडळ, श्रीराम चौकातील राजा शिवछत्रपती तरुण मित्र मंडळ, नेताजी चौकातील जय हनुमान तरुण मित्र मंडळ, त्याच प्रमाणे मधल्या मळ्यातील अमर गणेश मित्र मंडळ, हरजीबुवा मित्र मंडळ, पीरसाहेब गणेश मित्र मंडळ यांसारखी अनेक मंडळांनी गणेशची प्रतिष्ठापना केली होती,
                        
                      या १० दिवसाच्या दरम्यान  मंडळांनी विविध स्पर्धा आयोजित केल्या गेल्या.  त्यात राजा शिवछत्रपती मंडळ अग्रेसर ठरले. त्यांच्या या कामाची विशेष दखल विशेष गणोशोत्सव समितीने घेतली त्याची सविस्तर बातमी  पुढे दिलीली आहे.
                         विसर्जन खरया अर्थाने गणेशोत्सवामध्ये पाहण्यासारखे असते. त्याचे काही क्षणचित्रे सध्या टाकत आहे.
पिंपळगाव वार्ता : वैभव पोखरकर

बुधवार, १२ सप्टेंबर, २०१२

गणपती उस्तवासाठी आशीर्वाद इलेक्ट्रोनिक्स सज्ज

         आपल्या महाराष्ट्रात सर्वात उत्साहाने साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे गणराजाचा गणपती उत्सव. घरोघरी गणपती बसविला जातो. या उत्सवात महत्वाची असणारी बाब म्हणजे प्रत्येक घरामधील असणारी गणपतीची भव्य- दिव्य आरास. पूर्वी  गणपतीची आरास करायची असेल तर विद्युत रोषणाई असणारे साहित्य आणण्यासाठी पिंपळगाव मधील लोकं पुण्याला जायचे.  हळू हळू मंचरला हे साहित्य मिळू लागले. आज पिंपळगाव मध्येच हे साहित्य मिळू लागले आहे. आणि हे साहित्य देण्याची जबाबदारी  घेतली आहे.  आशीर्वाद इलेक्ट्रोनिक्स चे मालक हेमंत दिलीप बांगर यांनी.
          २००० सालापासून हेमंत बांगर याचे दुकान पिंपळगाव मधील ग्रामस्थांचे समाधान करीत आले आहे. मोबाईलच्या विविध वस्तू, सर्व प्रकारचे इलेक्ट्रोनिक वस्तू, एरटेल, आईडिया, रिलायन्स आदि कंपन्यांचे सिम कार्ड, विद्युत रोषणाई असणाऱ्या वस्तूंची भव्य आरस यासारख्या अनेक वस्तू ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. आणि तेही अतिशय कमी दरात. जर आपणासही या वस्तू हव्या असतील तर संपर्क साधा: हेमंत दिलीप बांगर :- ९८६०३७९३१३  

शनिवार, १ सप्टेंबर, २०१२

गणपती मूर्तिकार बाळासाहेब शिंदे.

                     काही लोकं खऱ्या अर्थाने एका वेगळ्या धाटणी तले असतात. जे  पैश्यापेक्षा कलेला अधिक महत्व देतात. असे बरेच कलाकार आमच्या गावामध्ये आहेत त्यातलेच एक म्हणजे आपले दुकानाचा व्यवसाय सांभाळून गणपतीच्या मूर्ती बनविण्याच्या कलेला जिवंत ठेवणारे श्री. बाळासाहेब श्यामराव शिंदे हे होय.
                       बाळासाहेब हे जातीने कुंभार आहेत.त्यामुळे नकळत का होईना वडिलोपार्जित मातीपासून वस्तू बनविण्याची कला त्यांना लहानपणापासूनच अवगत झालेली आहे. पण हा त्यांचा व्यवसाय मर्यादित स्वरूपाचा होता. म्हणजे गावामध्ये फक्त माठ, मडकी, चूल, बैल, इ. प्रकारच्या वस्तू बनविण्याचे काम व्हायचे त्याच्या वडिलांच्या काळा पर्यंत ठीक होते पण नंतर जस जसे जग आधुनिक होत गेले तस तसे गॅस, स्टोव्ह, स्टील हांडे इ. वस्तू मुळे साहजिकच त्यांच्या पारंपारिक वस्तूंना मागणी कमी पडत गेली. त्यामुळे बाळासाहेबांना उदरनिर्वाहासाठी पर्यायी सुविधेची गरज भासू लागली. आणि म्हणूनच आमच्या गावामध्ये प्रसिध्द असलेल्या चंद्रकांत तबाजी पोखरकर(वाणी) यांच्या किराणा दुकानामध्ये कर्मचारी म्हणून काम केले. हे काम करता करता त्यांनी त्यांच्या वडिलोपार्जित व्यवसायालाही जिवंत ठेवले. १९९७ साली त्यांना गणपती मूर्त्याचे विशेष आकर्षण वाटू लागले आणि तेव्हा पासून मातीच्या गणपती मूर्ती हाताने बनविण्यास सुरुवात केली. हळू हळू त्यांनी बनविलेल्या मूर्तीला मागणीही मिळू लागली.पहिले १०, नंतर ५०, त्यानंतर १०० असे करता करता त्यांच्या कामाचा व्याप एवढा वाढत गेला कि  आज तब्बल १००० मुर्त्या  दरवर्षी बनू लागल्या आहेत. आज किराणा क्षेत्रातही त्यांचे स्वत:चे दुकान झाले आहे. शिवाय गणपती, पोळा, नवरात्री या सारख्या सणाला मूर्त्याही बनविण्याचे काम तेवढ्याच ताकतीने चालू आहे.
                      मी ६ वी(१९९९) पासून  त्यांना जवळून पाहत आलो आहे. गणपती सिझन आणि आमच्या परीक्षेचा काळ एकच असायचा त्यावेळी मध्यरात्री पर्यंत तर कधी कधी सकाळ पर्यंत त्यांचे मुर्त्या बनविण्याचे काम पाहिले आहे. त्यांना १ मुलगा, १ मुलगी, आई, बायको असे ५ जणांचे कुटुंब आहे.
                          त्यांच्या गणपती मुर्त्या आपणास हव्या असतील तर या नंबर वर संपर्क साधावा:९८६०४१०४९६   

मंगळवार, २८ ऑगस्ट, २०१२

गाव झळकले वृत्तपत्रावर सकाळची बातमी

शैश्निक विकासाला चालना ; स्त्री भ्रुण  हत्या विरोधी जागृती

                                  या बातमी बाबत विचारणा केल्यावर सरपंच म्हणाले, "मुळात हे काम माझ्या एकट्याच्या कारकिर्दीतले नाही आहे या कामासाठी पिंपळगाव ग्रामस्थांचे विशेष हातभार लागले आहे. हि कामे वर्षानुवर्षे होत आलेली आहेत फक्त मी सरपंच असताना त्याची सकाळने त्याची दखल घेतली. मुळात कामाचे श्रेय मथाजी पोखरकर जि.प.सदस्य यांना द्यावे लागेल. बरीच विकासकामे ते सरपंच असताना पूर्ण झाली आहेत.  आमच्या गावाला एकजुटीने काम करायची गरज आहे आणि तसे आम्ही करत आहे. कोणत्याही विकासकामामध्ये आडकाठी न घालता सर्व जण एकमताने त्या कार्यात सहभागी होतात हि महत्वाची बाब आहे. ग्रामपंचायत सदस्य सचिन बांगर, बाळासाहेब पोखरकर, रोहिदास बन्सी पोखरकर, आशाभाभी, वसंत राक्षे, ग्रामसेवक रविंद्र भाऊसाहेब,  या सर्वांच्या परिश्रमाचे हे फलित आहे. मी फक्त निमिषमात्र आहे. "
                           सरपंच रोहिदास पोखरकर हे स्वत: मोठे गावळी आहेत, बंधू भोसरीत कपड्याचे उद्योजक आहेत  शिवाय त्यांना कोणत्याही प्रकारचा अहंकार नाही दरवर्षी वारकर्यांच्यासाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून मोठ्या प्रमाणात अन्नदान करतात. कीर्तने, संत संगत या प्रकारच्या कामांचे आयोजन करतात.  
                             शेवटी त्यांनी हेही नमूद केले कि, एक आदर्श सरपंच बनून दाखविण्याच्या हेतूने लवकरच स्त्री भ्रुण हत्ते च्या विरोधाप्रमाणेच व्यसनमुक्ती चळवळ राबविण्याचाही संकल्प करणार आहे.
-(पिंपळगाव वार्ता: वैभव भागवत )

मंगळवार, २१ ऑगस्ट, २०१२

रमजान ईद का त्योहार

रमजान माह की इबादतों और रोजे के बाद जलवा अफरोज हुआ ईद-उल फितर का त्योहार खुदा का इनाम है, मुसर्रतों का आगाज है, खुशखबरी की महक है, खुशियों का गुलदस्ता है, मुस्कुराहटों का मौसम है, रौनक का जश्न है। इसलिए ईद का चांद नजर आते ही माहौल में एक गजब का उल्लास छा जाता है।
ईद के दिन सिवइयों या शीर-खुरमे से मुंह मीठा करने के बाद छोटे-बड़े, अपने-पराए, दोस्त-दुश्मन गले मिलते हैं तो चारों तरफ मोहब्बत ही मोहब्बत नजर आती है। एक पवित्र खुशी से दमकते सभी चेहरे इंसानियत का पैगाम माहौल में फैला देते हैं।
अल्लाह से दुआएं मांगते व रमजान के रोजे और इबादत की हिम्मत के लिए खुदा का शुक्र अदा करते हाथ हर तरफ दिखाई पड़ते हैं और यह उत्साह बयान करता है कि लो ईद आ गई।

कुरआन के अनुसार पैगंबरे इस्लाम ने कहा है कि जब अहले ईमान रमजान के पवित्र महीने के एहतेरामों से फारिग हो जाते हैं और रोजों-नमाजों तथा उसके तमाम कामों को पूरा कर लेते हैं, तो अल्लाह एक दिन अपने उक्त इबादत करने वाले बंदों को बख्शीश व इनाम से नवाजता है।
आमच्याही गावात रमजान मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आमचे मुसलमान बांधव या दिवशी विविध मसाल्यांनी युक्त अश्या दुधाचे आयोजन करतात. त्याला शिरकुर्मा असे म्हणतात.सोबत गुलगुले हि असतात. अशी हि दावत विलोभनीय असते. हा कार्यक्रम सकाळी ८.०० पासून रात्री ९.०० वाजेपर्यंत चालतो.
इसलिए इस दिन को ईद कहते हैं और इसी बख्शीश व इनाम के दिन को ईद-उल फितर का नाम देते हैं।

शनिवार, १८ ऑगस्ट, २०१२

दहीहंडी

गोकुळाष्टमी म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस ! श्रीकृष्णाचा जन्म गोकुळाष्टमीच्या रात्री 12 वाजेच्या सुमारास कंस राजाच्या कोठडीत झाला. पण श्रीकृष्ण वाढला मात्र गोकुळात. नंद आणि यशोदेच्या प्रेमात आणि गोपिकांच्या सहवासात. गोकुळातच चोरून लोणी खाणे, गोपिकांची छेड काढणे अशा लीला त्याने केल्या. घराच्या छताला टांगलेली दह्याची हंडी श्रीकृष्ण फोडायचा. तीच प्रथा आता दहीहंडीच्या रूपाने पाळली जाते. पण, काळाच्या ओघात हा उत्सव इतका बदलला आहे की, त्या मागची मुळ संकल्पनाच नाहीशी झाली आहे.

''गोविंदा आला रे आला....मटकी संभाल ब्रिजबाला !'' असे म्हणणार्‍या गोविंदाला बाजूला सारत आधुनिक युगात पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात वावरणार्‍या महिलाही दहीहंडी फोडण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिसतात.
                             आमच्या गावातही या दिवशी मोठया उत्सवात दहीहंडी साजरा केला गेला. पिंपळगावच्या नेताजी आळीमध्ये हा उत्सव पार पडला. जय हनुमान मंडळाच्या वतीने ही दहीहंडी आयोजित केली गेली. साऊंडच्या आवाजामध्ये नाचगाण्याच्या जल्लोषात ही दहीहंडी साजरी करण्यात आली त्याची काही क्षणचित्रे....

मंगळवार, ७ ऑगस्ट, २०१२

नागपंचमी

नागपंचमी सण श्रावण शुद्ध पंचमीला साजरा केला जातो.
श्रावण महिन्यातील पहिला महत्वाचा सण नागपंचमी हा आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करतात. हा सण वेदकालापासून सुरू झाला.
भगवान श्रीकृष्ण कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षीत वर आले तो दिवस श्रावण शुध्द पंचमी होता. तेव्हांपासून नागपूजा प्रचारात आली असे म्हणतात. या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. कोणीही खणत नाही, घरीपण कोणीही भाज्या चिरायच्या नाही, तवा वापरायचा नाही, हे नियम पाळत असतात. नागदेवता ची पूजा करून त्याला दूध लाह्यांचा नैवेद्य दाखवतात,गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखविला जातो. व आपले संरक्षण कर अशी प्रार्थना करतात.
                             ही झाली नागपंचमीची थोडक्यात माहिती आता आमच्या गावात सोमवार दि.२३ ७ २०१२ रोजी झालेली नागपंचमी खालील प्रमाणेः
१. महिला या दिवशी फुगडया, झिम्मा, झोके खेळतात
२. गावातील पुरूष मंडळी श्रीराम मंदीरा पुढील गोटी उचलतात.

सोमवार, २ जुलै, २०१२

आषाढी वारी निमित्त पंढरपुरास गेलेल्या श्रीराम प्रासादिक भजनी मंडळाचे मायभुमीत आगमण

टाळी वाजवावी |गुढी उभारावी||
वाट ती चालावी पंढरीची...................
या उक्तीप्रमाणे सालाबाद प्रमाणे याही वर्षी पिंपळगाव खडकीच्या भाविकांनी पायी दिंडी सोहळयाचा आनंद लुटला आहे.

पिंपळगाव (खडकी)चे संकेतस्थळ तयार


          पिंपळगाव (खडकी)ची सामाजिक सांस्कृतिक राजकिय प्रगती झपाटयाने होत असताना तंत्रज्ञानाच्या बाबत गावाने मागे न राहायाचे ठरविले आहे. याच धर्तीवर गाव आपल्या गावाबाबतची इस्तंभुत माहिती जगाच्या नकाशावर संकेतस्थळाच्या स्वरूपात जगासमोर आणन्याचे ठरविले आहे.

         गावाने संबंधीत संकेतस्थळामध्ये गावाविषयी,सर्वसाधारण माहिती,ग्रामपंचायतीविषयी,पुरातन वास्तु व मंदिरे,उत्सव व परंपरा, शैक्षणिक विकास, आरोग्य केंद्र, व्यावसायासंबधी, विकासकामे, मिळालेले पुरस्कार, मान्यवरांच्या भेटी, गावातुन घडलेले, गावचा नकाशा, चालु घडामोडी इत्यादी माहीती सविस्तर स्वरूपात दिली आहे.

         या संकेतस्थाळच्या निर्मितीसाठी प्रामुख्याने या गावचे ग्रामसेवक रविंद्र केशव खंडारे, ग्रामपंचायत सदस्य सचिन बांगर, सरपंच रोहिदास पोखरकर तसेच रशिदभाई इनामदार, सुभाष पोखरकर, इतर ग्रामस्थ मंडळींची यांची मोलाची मदत लाभली.