बुधवार, १२ सप्टेंबर, २०१२

गणपती उस्तवासाठी आशीर्वाद इलेक्ट्रोनिक्स सज्ज

         आपल्या महाराष्ट्रात सर्वात उत्साहाने साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे गणराजाचा गणपती उत्सव. घरोघरी गणपती बसविला जातो. या उत्सवात महत्वाची असणारी बाब म्हणजे प्रत्येक घरामधील असणारी गणपतीची भव्य- दिव्य आरास. पूर्वी  गणपतीची आरास करायची असेल तर विद्युत रोषणाई असणारे साहित्य आणण्यासाठी पिंपळगाव मधील लोकं पुण्याला जायचे.  हळू हळू मंचरला हे साहित्य मिळू लागले. आज पिंपळगाव मध्येच हे साहित्य मिळू लागले आहे. आणि हे साहित्य देण्याची जबाबदारी  घेतली आहे.  आशीर्वाद इलेक्ट्रोनिक्स चे मालक हेमंत दिलीप बांगर यांनी.
          २००० सालापासून हेमंत बांगर याचे दुकान पिंपळगाव मधील ग्रामस्थांचे समाधान करीत आले आहे. मोबाईलच्या विविध वस्तू, सर्व प्रकारचे इलेक्ट्रोनिक वस्तू, एरटेल, आईडिया, रिलायन्स आदि कंपन्यांचे सिम कार्ड, विद्युत रोषणाई असणाऱ्या वस्तूंची भव्य आरस यासारख्या अनेक वस्तू ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. आणि तेही अतिशय कमी दरात. जर आपणासही या वस्तू हव्या असतील तर संपर्क साधा: हेमंत दिलीप बांगर :- ९८६०३७९३१३  

शनिवार, १ सप्टेंबर, २०१२

गणपती मूर्तिकार बाळासाहेब शिंदे.

                     काही लोकं खऱ्या अर्थाने एका वेगळ्या धाटणी तले असतात. जे  पैश्यापेक्षा कलेला अधिक महत्व देतात. असे बरेच कलाकार आमच्या गावामध्ये आहेत त्यातलेच एक म्हणजे आपले दुकानाचा व्यवसाय सांभाळून गणपतीच्या मूर्ती बनविण्याच्या कलेला जिवंत ठेवणारे श्री. बाळासाहेब श्यामराव शिंदे हे होय.
                       बाळासाहेब हे जातीने कुंभार आहेत.त्यामुळे नकळत का होईना वडिलोपार्जित मातीपासून वस्तू बनविण्याची कला त्यांना लहानपणापासूनच अवगत झालेली आहे. पण हा त्यांचा व्यवसाय मर्यादित स्वरूपाचा होता. म्हणजे गावामध्ये फक्त माठ, मडकी, चूल, बैल, इ. प्रकारच्या वस्तू बनविण्याचे काम व्हायचे त्याच्या वडिलांच्या काळा पर्यंत ठीक होते पण नंतर जस जसे जग आधुनिक होत गेले तस तसे गॅस, स्टोव्ह, स्टील हांडे इ. वस्तू मुळे साहजिकच त्यांच्या पारंपारिक वस्तूंना मागणी कमी पडत गेली. त्यामुळे बाळासाहेबांना उदरनिर्वाहासाठी पर्यायी सुविधेची गरज भासू लागली. आणि म्हणूनच आमच्या गावामध्ये प्रसिध्द असलेल्या चंद्रकांत तबाजी पोखरकर(वाणी) यांच्या किराणा दुकानामध्ये कर्मचारी म्हणून काम केले. हे काम करता करता त्यांनी त्यांच्या वडिलोपार्जित व्यवसायालाही जिवंत ठेवले. १९९७ साली त्यांना गणपती मूर्त्याचे विशेष आकर्षण वाटू लागले आणि तेव्हा पासून मातीच्या गणपती मूर्ती हाताने बनविण्यास सुरुवात केली. हळू हळू त्यांनी बनविलेल्या मूर्तीला मागणीही मिळू लागली.पहिले १०, नंतर ५०, त्यानंतर १०० असे करता करता त्यांच्या कामाचा व्याप एवढा वाढत गेला कि  आज तब्बल १००० मुर्त्या  दरवर्षी बनू लागल्या आहेत. आज किराणा क्षेत्रातही त्यांचे स्वत:चे दुकान झाले आहे. शिवाय गणपती, पोळा, नवरात्री या सारख्या सणाला मूर्त्याही बनविण्याचे काम तेवढ्याच ताकतीने चालू आहे.
                      मी ६ वी(१९९९) पासून  त्यांना जवळून पाहत आलो आहे. गणपती सिझन आणि आमच्या परीक्षेचा काळ एकच असायचा त्यावेळी मध्यरात्री पर्यंत तर कधी कधी सकाळ पर्यंत त्यांचे मुर्त्या बनविण्याचे काम पाहिले आहे. त्यांना १ मुलगा, १ मुलगी, आई, बायको असे ५ जणांचे कुटुंब आहे.
                          त्यांच्या गणपती मुर्त्या आपणास हव्या असतील तर या नंबर वर संपर्क साधावा:९८६०४१०४९६