रविवार, ३० जून, २०१३

श्रीराम प्रासादिक पायी दिंडी सोहळा प्रस्थान

दिनांक : ३० जून २०१३
श्री.ज्ञानेश्वर महाराज पालखी दिंडी सोहळा
आळंदी ते पंढरपूर
समाजभूषण कै. कुशाभाऊ शेठ बबनराव बांगर यांचे प्रेरणेने वै.ह.भ.प. भानुदास महा. दहिफळे यांचे कृपाआशीर्वादाने
श्रीराम प्रासादिक पायी दिंडी सोहळा, पिंपळगाव (खडकी)
 
सर्व भाविकांना कळविण्यास अन्नद वाटतो कि, सानास्थ ग्रामस्थ पिंपळगाव, पंचक्रोशीतील वारकरी बांधवांच्या प्रेरणेने आणि आपणा सर्वांच्या सद्भावनेतून आणि सहकार्याने श्री. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी समवेत दिंडीचे आयोजन केले आहे तरी सर्व भाविकांनी या सोहळ्याचा आनंद  घ्यायचा आहे.
 

रविवार, २३ जून, २०१३

विनोद आता मोठा झाला : "वटपोर्णिमा स्पेशल"

वटपोर्णिमा स्पेशल......
सासु - अगं सुनबाई उठ लवकर. आज
वटपौर्णिमा वडाची पूजा नाही करायची का ?
 सुन - मला जाम कंटाळा आलाय. घरीच करते पूजा.....
माझा लैपटॉप आणा बरं इकड़...
(सुनबाई टाइप करते) डबल्यू डबल्यू डबल्यू डॉट वडाचंझाड
डॉटकॉम...ऑनलाइन वडाची पूजा
सुन:- - माझे फेरे घालते...वन, टू, थ्री, फोर, फाइव, सिक्स , सेवेन....
आता तुमचे एक, दोन , तिन , चार, पाच , सहा, सात...झाली एकदाची वडाची पूजा...!!!
सासु - माझे गं  कशाला घातले फेरे ....? तुझे सासरे जावून ३ वर्ष झाले की ग आता ....
 सुन - अय्या खरचं की...sorry हं....undo करते... !!!

आपल्या भारतीय संस्कृतीमधील व्रत - वटपोर्णिमा

२३ जून २०१३
 
                आपल्या हिंदू संस्कृतीत व्रताना खूप महत्व आहे.पूर्वींच्या तुलनेत सध्याची स्त्री हि अधिक सुशिक्षित झाल्यामुले वेल आणि पैसा यांना महत्व येऊन व्रतांचे महात्म्य कमी झाले.आज 'लीव इन रिलेशनशिप " चा जमाना आहे. त्यामुळे वटपौर्णिमा कालबाह्य ठरते आहे.दुर्दैवाने या व्रतांमागील नेमका हेतू विधी आणि फळ याची माहिती नसल्याने व्रत म्हणजे उपवास व पूजा अशीच संकल्पना धृढ होते आहे.उपवास म्हणजे भरपूर फराळाचे पदार्थ खाणे व पूजा म्हणजे अवडंबर माजवून दिखावा करणे,यामुळे आधुनिक पिढीला त्यातील महत्व कळत नाहीये.असो. कुठल्याही व्रताची ५ अंगे आहेत. संकल्प,पूजा, उपवास, दान व विशिष्ट आचार,हि होत.कोणत्याही व्रताची सुरवात संकल्पानेच करावी.व्रताच्या दिवशी फलाहार करावा .पण फलाहाराचे भ्रष्ट  रूप फराळ होऊन रोजच्या जेवणासारखे पदार्थ खाल्ले जातात. हे सर्व पदार्थ पित्त वाढवणारे  व पचनाला जड असल्याने त्याचा त्रासाच होतो.हि व्रते करताना आपल्या  पूर्वजांनी वयाचाही विचार केला आहे .सर्वसाधारण ५०  वर्षापर्यंतच व्रते आचरावी. एकदशि सारखे व्रत मात्र शेवटपर्यंत केले जाते.खर म्हणजे पती-पत्नीचे एकमेकवर खरे प्रेम असेल तरच वटपौर्णिमा साजरी करण्यात अर्थ आहे.दोघातील स्नेहबंध धृढ करणारा असा हा सण आहे.
             सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळविण्यासाठी यामराजना आपल्या भक्तीने संतुष्ट करून आपल्या पतीचे प्राण परत्र मिळविले. अशी आख्यायिका पुराणात आहे,
                                          करुनी निश्चय मनासी,नारद बोले सावित्रीसी;
                                           ज्येष्ठमास त्रयोदशी ,  करुनी पूजन  वदासी ;
                                            त्रिरात्र व्रत करुनी,     मागे औष्य चुड्यासी;
                                               येईल यम छालावाया ,शरण जी तयापासी.............
             वटसावित्री व्रताची सुरवात पौर्णिमेच्या आधी दोन दिवस होते. सौभाग्य मीळो   ; वटवृक्षाप्रमाणे  कुल वाढो;अशी भावना या व्रतामागे असते.  प्रत्येक दिवशी १०८ प्रमाणे ३ दिवस वडाला प्रदक्षिणा घालतात. ३ दिवस उपवास करतात.पण कालमानानुसार यात बदल झाला आहे.हे व्रत १ च दिवस म्हणजे ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा या दिवशी केले जाते.
             पुजेची तयारी करताना हिरव्या बांगड्या,कापुर, पुजेची कापसाची गेजवस्त्रे,  गळेसर ,विड्याची पाने,सुपारी ,पैसे,पंचामृत व गुलखोब्रर्याचा नैवेद्या ५ आंबे ,दुर्वा वगै. इत्यादी साहित्याची तयारी ठेवावी.
 प्रत्यक्ष पूजेला सुरवात करताना प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी. हळद -कुंकू ,गंध ,लाल फुल अक्षता यांनी गणपतीची पूजा झाल्यावर वादाची किंवा वादाचे चित्र असणाऱ्या कागदाची पूजा करावी.
 या दिवशी उपवास करावा.  वाडापुढे आंबे व पैसे ठेवावे.५ सवाष्णीची आंबा व गव्हाने  ओटी भरावी. काही ठिकाणी १ वाण घरात ठेऊन  बाकीची  इतर ४  घरी जाऊन देतात. वडाला ३ प्रदक्षिणा घालाव्या. वडाला गुंडाळायचा दोरा तिहेरी आसतो.विवाहानंतर सुवासिनी असेपर्यंत प्रत्येक स्त्रीने हे व्रत करावे.हे सौभाग्यावार्धक व्रत आहे.
             आधुनिक काळात अगदी जन्मोजन्मी हाच पती मिळावा हे मागणे सयुक्तिक नसले तरी निदान आहे या जन्मात आपल्या सह्चाराच्या विचारांशी मुलांसमोर सहमती दाखवून नंतर सावकाश त्याचे दोष त्याला
 समजावता येतात. तसेच वेळ नाही म्हणून वादाची फांदी आणून पूजा करणे हे मुळीच योग्य नाही. ज्या वृक्षाची आपण पूजा करतो त्याच्याच फांद्या तोडून त्यांची पूजा करणे हे हास्यास्पद आहे. त्यासाठी घरी पाटावर
 वडाचे चित्र गंधाने काढून त्याची पूजा करावी.या व्रतास "ब्रह्मसावित्रीची पूजा " असेही म्हणतात.
             आपण ठरवले तर फक्त "वटपौर्णिमा" च नाही तर इतर सण उत्सव, व व्रते यांना मुळ स्वरूपाला बाधा  न आणू देता नवे स्वरूप देऊन जपता येतील. भक्तीने केलेली साधी पूजा हि मला पोहोचते.असे भगवंतच  सांगतात. असो .नवीन दृष्टीकोन स्वीकारून हि वटपौर्णिमा आपण साजरी करूया.
 

शनिवार, २२ जून, २०१३

गावात नागरी सुविधा केंद्र सुरु......

गावामध्ये आज नागरी सुविधा केंद्र सुरु झाले. आहे. आता सरकारी कागदपत्रे, दाखले, उतारे, जन्माचा दाखला, आदि. विविध प्रकारचे दाखले अतिशय कमी दरात तुम्हाला उपलब्ध होणार आहेत.
           या कार्यालयाचे उद् घाटन  पुणे जिल्हा परिषद सदस्य मा.श्री. मथाजी पोखरकर यांनी केले. त्याचप्रमाणे पिम्पाल्गावातील सरपंच, ग्रामस्थ, मा.श्री. टी.के. बांगर, मा.श्री. प्रभाकर बांगर, श्रीराम विद्यालयाचे मुख्याध्यापक हेही उपस्थित होते.

चला शिकूया.... पुढे जाऊया.....- दैनिक सकाळ


मुक्तिधाम व उद्यान परिसर विकास शुभारंभ व गुणवंत विद्यार्थी व शिक्षक सन्मान सोहळा....

१७ जून २०१३
  नुकताच पिंपळगाव खडकीमध्ये मुक्तिधाम व उद्यान परिसर विकास शुभारंभ व गुणवंत विद्यार्थी व शिक्षक सन्मान सोहळा.... पार पडला या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा.श्री. दत्त्त्तामामा भरणे व त्यांच्या समवेत पुणे जिल्हा परिषदेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
            या कार्यक्रमा मध्ये मुक्तिधाम व उद्यान परिसराच्या कामाचा शुभारंभ झाला. त्याचप्रमाणे गावातील पिराच्या मळ्यातील ठिकाणी अंगणवाडी केंद्राचे उदघाटन करण्यात आले. तसेच खालील मान्यवरांचा ज्यांनी या गावासाठी योगदान केले त्यांचा सत्कार करण्यात आला.
१) इयत्ता ४ थी च्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थी व त्यांच्या विकासासाठी परिश्रम घेणाऱ्या शिक्षकांचा सत्कार

२) श्रीराम विद्यालय, पिंपळगाव (खडकी) च्या १० वी च्या विद्यार्थ्यांचा या वर्षी ९७% निकाल लागला. त्यात प्रथम क्रमाक मिळविणाऱ्या विद्यार्थिनीचा सत्कार.

३) त्याच प्रमाणेमाध्यमिक विभाग  श्रीराम विद्यालयामध्ये नव्याने रुजू झालेले हरहुन्नरी, कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक मा.श्री.सुर्यकांत मेंगडे सर यांचा सत्कार करण्यात आला.

४) तसेच ग्रामपंचायत पिंपळगाव तर्फे महाळुंगे अंतर्गत सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, लेखनिक, शिपाई ज्यांच्या योगदानामुळे आणि सहकार्याने गावाला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत जिल्हा आणि राज्यपातळी वरील तब्बल १५ लाखाचा पुरस्कार पटकावला. त्यांचाही ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.

५) पिंपळगावचा मानाचा आवाज मा.श्री. शिवाजीशेठ शंकर पोखरकर ज्यांच्या योगदानामुळे जय हनुमान मंदिर व पिंपळेश्वर मंदिरांच्या जीर्नोधारासाठी लोकसमूहातून तब्बल १० लाखाचा निधी उभा राहिला त्यांचाही सत्कार करण्यात आला.

६) या गावाला तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्वत:ची आगळी -वेगळी ओळख ज्यांनी निर्माण केली. पहिल्यांदा परदेशी पाहुणे ज्या गोष्टीमुळे पिंपळगावला पाहायला आले. अशी तालुक्यातील पहिली गावाची वेबसाईट तयारक पिंपळगावचे सुपुत्र संगणक प्रशिक्षक श्री. वैभव पोखरकर यांचाही सत्कार करण्यात आला.

७) या सगळ्या गोष्टीमागे ज्या व्यक्तीचा सिंहाचा वाटा आहे. समाज्याच्या  विकासाचे जणू स्वप्नच पाहून जो जन्माला आहे. असे समाज उन्नतीसाठी रात्रंदिवस झगडणारे तरुण वर्गांच्या गळ्यातला ताईत तरुण तडफदार व्यक्तिमत्व पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य मा.श्री. मथाजी पोखरकर यांचाही मा.श्री.दत्त्त्तामामा भरणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पिंपळगाव मध्ये संपूर्ण गावाला वीजपुरवठा करणाऱ्या मुख्य डी.पी. ची अवस्था...

१० जून २०१३
आता पहा पिंपळगाव मध्ये संपूर्ण गावाला वीजपुरवठा करणाऱ्या मुख्य डी.पी. ची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. या रस्त्याचे काम होऊन तब्बल ६ महिने झाली असतील तेव्हापासून  या डीपी चा हा खांब असाच आहे. त्याबाबत MSEB ला पत्र हि पाठविले आहे. तरीही अद्याप याबाबत दाखल घेतली जात नाही.
                        या खांबाच्या शेजारी दुध डेअरी आहे. शिवाय शेजारील बाजूस शाळा आहे. सध्या पाऊसही चालू आहे. जोरदार पावसाने भक्कम खांब, झाडे उन्मळून पडतात तेथे या खांबाचा काय निभाव लागणार. शिवाय शेजारी प्रशस्त ग्राउंड असल्यामुळे मुलं तेथे खेळायला येतात. जर त्यांच्या अंगावर दुर्दैवाने हा खांब पडला तरी किती महागात पडेल? त्यात  उत्तरप्रदेश मधील घटना ताजी आहे. याचा विचार करण्याची गरज आहे.

पिंपळगाव ओढ्यालगतच्या रस्त्याचे कामकाज सुरु.....

 
पिंपळगाव खडकी मध्ये आपण ज्यावेळेस एन्ट्री मारतो त्यावेळेस एक ओढा लागतो. ज्याला पिंपळगाव ओढा म्हणतात. याच ओढ्याच्या लगत इनामदार वस्ती ते पिंपळगाव पर्यंतचा एक किलोमीटरच्या रस्त्याचे कामकाज सुरु असताना....
१) यामुळे ओढ्यामध्ये साचलेल्या गाळाचे योग्यप्रकारे नियोजन होईल. 
२) गाळउपसामुळे  ओढ्याची खोली वाढणार आहे.
३) ओढ्याची खोली वाढल्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे.
४) एकंदरीत ओढ्या लगतच्या शेतकऱ्यांना भरपूर पाण्याची सोय होणार आहे.
दरम्यानच्या कामाप्रसंगी जी.प.सदस्य मथाजी पोखरकर, सरपंच रोहिदास शंकर पोखरकर , ग्रामपंचायत सदस्य सचिन बांगर व रोहिदास बन्सी पोखरकर उपस्थित होते.