शनिवार, १८ ऑगस्ट, २०१२

दहीहंडी

गोकुळाष्टमी म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस ! श्रीकृष्णाचा जन्म गोकुळाष्टमीच्या रात्री 12 वाजेच्या सुमारास कंस राजाच्या कोठडीत झाला. पण श्रीकृष्ण वाढला मात्र गोकुळात. नंद आणि यशोदेच्या प्रेमात आणि गोपिकांच्या सहवासात. गोकुळातच चोरून लोणी खाणे, गोपिकांची छेड काढणे अशा लीला त्याने केल्या. घराच्या छताला टांगलेली दह्याची हंडी श्रीकृष्ण फोडायचा. तीच प्रथा आता दहीहंडीच्या रूपाने पाळली जाते. पण, काळाच्या ओघात हा उत्सव इतका बदलला आहे की, त्या मागची मुळ संकल्पनाच नाहीशी झाली आहे.

''गोविंदा आला रे आला....मटकी संभाल ब्रिजबाला !'' असे म्हणणार्‍या गोविंदाला बाजूला सारत आधुनिक युगात पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात वावरणार्‍या महिलाही दहीहंडी फोडण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिसतात.
                             आमच्या गावातही या दिवशी मोठया उत्सवात दहीहंडी साजरा केला गेला. पिंपळगावच्या नेताजी आळीमध्ये हा उत्सव पार पडला. जय हनुमान मंडळाच्या वतीने ही दहीहंडी आयोजित केली गेली. साऊंडच्या आवाजामध्ये नाचगाण्याच्या जल्लोषात ही दहीहंडी साजरी करण्यात आली त्याची काही क्षणचित्रे....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा