सोमवार, ४ मार्च, २०१३

निर्मल भारत अभियान पुणे जिल्हा परिषदेला पाठवलेला रिपोर्ट

पिंपळगाव तर्फे महाळुंगे, ता-आंबेगाव, जिल्हा -पुणे.
गावाचे वर्णन :-
                 पिंपळगाव तर्फे महाळुंगे हे गाव मंचर पासुन 5 कि.मी पुर्वेकडे वसलेले असुन गावाला पश्चिम-पुर्व वाहणारी घोडनदी लाभलेली आहे. शेजारील गावाला लाभलेल्या भव्य तटामुळे नदीचा परिसर शोभिवंत वाटतो.
                गावची लोकसंख्या किमान सहा हजाराच्या आसपास आहे. गावचे क्षेत्रफळ 696.81 हेक्टर पैकी गायरान 34.62 हेक्टर व लागवडीलायक क्षेत्र 602.38 हेक्टर असुन, ग्रामदैवत मुक्तादेवी मंदीर, श्रीराम मंदीर, श्री हनुमान मंदीर, आणि श्री कमलजादेवी अशी अनेक देव-देवतांची मंदीरे आहेत. गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत सन 1953 साली स्थापन झाली. गावाला आजपर्यंत अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत.गावाला आजतागायत विविध पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने  जाने-२०१३ मध्ये प्राप्त झालेला २०११-१२ चा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा पुणे जिल्ह्यातील प्रथम पुरस्कार. या पुरस्कारामध्ये गावाला पाच लाख रुपयाचे पारितोषिक मंजूर  झाले. त्याचप्रमाणे इतरही काही पुरस्कार खालीलप्रमाणे :
१.संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात तालुकास्तरावर प्रथम (सन २००८-२००९)  
२. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानांतर्गत आबासाहेब खेडकर पुरस्कार पुणे जिल्हयामध्ये तृतिय (सन २००८-२००९) 
३. संत गाडगेबाबा ग्रामस्वछता अभियान पुणे जिल्हयात तृतीय (सन २०१०-११)  
४. संत गाडगेबाबा अभियाना अंतर्गत साने गुरूजी आदर्श स्वच्छ शाळा म्हणुन प्रथम (सन २०१०-११)   
५. पुणे जिल्हा परिषदेचा आदर्शशाळा म्हणुन जिल्हयात प्रथम (सन २०११-१२)  
६. महात्मा गांधी तंटामुक्त अभिमाना अंतर्गत पाच लक्ष रूपयाचे पारितोषिक (सन २०१०-११)  
७. पुणे जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या वतीने २०१२ या वर्षाचा "आदर्श ग्रामसेवक पुरस्कार" मा.रविंद्र खंडारे यांना प्राप्त झाला.

यापूर्वीची गावाची परिस्थिती :-
                तसं पाहायला गेलं तर घोडनदी पाणी लाभल्यामुळे बहुतांशी परिसर पाण्याखाली आहे. त्यामुळे बागायती जमिनी आहेत. परंतु स्वच्छतेच्या बाबत गावामध्ये निराशाजनक परिस्थिती होती. उघडी गटारे, शौंचाला उघड्यावर बसणे, नदीमध्ये गावातील सांडपाणी सोडणे, देऊळ, शाळा, वाचनालय, दुध डेअरीच्या मागील बाजूस लोकं लघुशंका करत. सर्वात जास्त घाण ही नदी किनाऱ्यावर, स्मशानभूमीच्या ठिकाणी असायची. त्यामुळे साहजिकच तेथील जागा मच्छर व घाणीच्या वासाने भरलेली असायची. त्यामुळे गावामध्ये आजारी व्यक्तींची संख्या जास्त असायची. गावात आरोग्य केंद्र होते. पण लोकं जनजागृतीच्या अभावामुळे हि लोकं त्या आरोग्यकेंद्रात क्वचितच जात असत. पाण्याची टाकी आता पडायला आली होती. मराठी शाळेची वाताहत झाली होती.
मथाजी पोखरकर सरपंच पदावर आल्यानंतर गावातील एक-एक काम हळू हळू मार्गी लागायला लागले. नवीन पाण्याची टाकी झाली, बंधिस्त गटारे झाली, अंतर्गत रस्त्यांचे कॉक्रीटीकरण झाले, ग्रामपंचायतीची नवीन इमारत झाली, दोन वर्षात ३ मंदिरे बांधली गेली, सार्वजनिक  शौचालयाचे बांधकाम करण्यात आले.  विशेष म्हणजे स्मशानभूमीचा परिसर जो सगळ्यात घाण  समजला जायचा त्याची इतकी डेव्हलपमेंट केली की आणखी काही  लाख गुंतवले की पर्यटन स्थळच होईल. गावाला सभागृह झाले. गावात ३ अत्याधुनिक तंत्राने सज्ज संगणक प्रयोगशाळा आहेत.मराठी शाळेमध्ये लोकसहभागातून शिवचित्र सृष्टीने सज्ज भव्य सभागृह बांधण्यात आले. पिंपळगाव ते पिंपळगाव फाटा रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण झाले, मुक्ताबाई पूल  अशी अनेक विकासकामे गावात झाली.
२००६-०७ नंतर गावाने शासनाच्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी व्हायला सुरुवात केली. त्यामध्ये प्रामुख्याने निर्मल ग्राम पुरस्कार, पर्यावरण संतुलित ग्राम पुरस्कार, इ.आज गावात १००% बंधिस्त गटारे आहेत, १००% हगणदारी मुक्त आहे, त्याचप्रमाणे सांडपाण्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन केले आहे. तरीही गावामध्ये अजून बरीच डेव्हलपमेंट करणे बाकी आहे. 
गावाच्या चतुःसीमा 
पुर्वेस :- निरगुडसर
पश्चिमेस:- चांडोली, मंचर
उत्तरेस:- खडकी
दक्षिणेस:- अवसरी खुर्द
: येण्या-जाण्याचे मार्ग :
मंचरमार्गे ->पिराचा मळा->पिंपळगाव तर्फे महाळुंगे
अवसरीमार्गे-> लिंबाचा मळा->पिंपळगाव तर्फे महाळुंगे
खडकीमार्गे-> पुल ओलांडुन->पिंपळगाव तर्फे महाळुंगे
निरगुडसरमार्गे-> गव्हाळीमळा->पिंपळगाव तर्फे महाळुंगे

               
गावाची तालुक्यातील पहिली अत्याधुनिक वेबसाईट :-
                तंत्रज्ञानामध्येही गावाने मागे न राहता तब्बल ३० हजार रुपये खर्च करून गावाची मराठीतून वेबसाईट तयार केली आहे. त्यामध्ये गावाचे ऑनलाइन बातमीपत्र ही आहे, गावचा उपग्रहावरून  नकाशाही आहे. ग्रामपंचायतीची कामकाज, विकासकामे, फोटो ही वेबसाईटवर आहेत. गावाला भेट दिलेल्या मान्यवरांची तसेच इतर बाबीची व्हिडीओ सुद्धा आहे. ही वेबसाईट पाहण्यासाठी खालील पत्ता गुगल वर टाईप  करा.
www.ambegaon.com  किंवा  http://www.ambegaon.com/village/pimpalgaonkh.html किंवा pimpalgaonkh.com

रविवार, ३ मार्च, २०१३

आता महत्वाच्या व्हिडिओ सुद्धा दिसणार पिंपळगाव (खडकी) या वेबसाईटवर ....

पिंपळगाव खडकीचे महत्वाचे व्हिडीओ आता तुम्ही आंबेगाव डॉट कॉमच्या वेबसाईट वरून पाहू शकता.
अवश्य भेट द्या : http://ambegaon.com/village/pimpalgaonkh/video.html

पिंपळगाव (खडकी ) वेबसाईटची मान्यवरांनी केली पाहणी.....

फिनलंड देशाच्या अधिकाऱ्यांना पिंपळगाव (ख )वेबसाईटमागील भूमिका सांगताना वैभव पोखरकर
 
संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान समितीने पिंपळगाव (ख) वेबसाईटची सविस्तर माहिती जाणून घेतली वेबसाईट बाबत सांगताना मा. श्री. माथाजी पोखरकर 
पुणे ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार श्री. डी. के. वळसे सर आंबेगाव.कॉम ची पाहणी करताना....
आंबेगाव तालुका राष्ट्रवादी पक्षाचे कार्याध्यक्ष मा. श्री. बाबुराव दादा बांगर वेबसाईट ची पाहणी करताना....


पुणे जिल्ह्याचे सी.ओ. मा.श्री. उत्तमराव करपे  वेबसाईट ची पाहणी करताना....
महानंदा दुध संघाच्या अध्यक्षा सौ. वैशालीताई नागवडे यांनीही आंबेगाव.कॉम व पिंपळगाव (खडकी) या वेबसैटची पाहणी केली.

आंबेगाव डॉट कॉम वेबसाईट Visit:- ww.ambegaon.com

पिंपळगाव (ख.) गावाची वेबसाईट


पिंपळगाव (खडकी ) मध्ये रस्त्याचे काम जोरात सुरु....


भारत सरकार क्षेत्रीय प्रचार समितीची भव्य रॅली पिंपळगाव (खडकी) मध्ये )