शुक्रवार, ३ मे, २०१३

पिंपळगाव खडकीची संकेतस्थळाच्या माध्यमातून गरुडझेप.....

                       "आधुनिक गाव" या संज्ञेचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पिंपळगाव खडकी होय. गावात एकोपा असेल, नव्या दमाच्या आणि जुन्या जाणत्या मंडळींचा मेल असेल तर खऱ्या अर्थाने आदर्शगाव, आधुनिक खेडं जन्माला येतं. अश्याच प्रकारे समाजव्यवस्थेला आदर्शाची वाट दाखविणारं पिंपळगाव (खडकी) गाव जगाच्या कानाकोपऱ्यात झळकले आहे. पुरस्काराची शिखरे पादाक्रांत करणाऱ्या या गावाचे संकेतस्थळ (वेबसाईट) तयार झाली आहे. त्यामुळे गावाची संपूर्ण माहिती सातासमुद्रापार पोहोचणार असून, एका क्लिक वर पिंपळगाव (खडकी) ची खडान् खडा माहिती पाहायला मिळणार आहे. इंटरनेटच्या माध्यमातून जगाशी नाळ जोडणाऱ्या या वैभवामुळे आंबेगाव तालुक्याची मान निश्चितच उंचावणार आहे.
                अशी आहे वेबसाईट www.pimpalgaonkhadki.com हि वेबसाईट ओपन झाल्यानंतर गावात आत्तापर्यंत झालेली विकास कामे पाहायला मिळतात. शिवाय गाव लागले कामाला.. विकासाच्या ध्यासाला यासंबधीचे फोटो पाहायला मिळतात. पिंपळगाव खडकी ची वेबसाईट ही गावाच्या  माहितीसाठी तयार केलेले ऑनलाईन पुस्तक आहे. ज्यामध्ये गावाविषयी माहिती, पुरातन मंदिरे व वास्तू, ग्रामपंचायतीचे कामकाज, विकासकामे, गावाला मिळालेले पुरस्कार, फोटो संग्रह, व्हिडिओ संग्रह, गावाचा सॅटेलाईट नकाशा, शैक्षणिक, गावात घडणाऱ्या चालू घडामोडी आदी बाबींचा समावेश शिवाय गावाला स्वत:चा स्वतंत्र ई-मेल आयडी व फेसबुक दिलेला आहे.
            या वेबसाईट मुळे पिंपळगाव खडकी गावाला फिनलंड देशातील परदेशी पाहुण्यांची, जागतिक बँकेच्या अधिकारी यांची भेट लाभली आहे.त्याचप्रमाणे  संत गाडगेबाबा व संत तुकडोजीं महाराज ग्रामस्वच्छता अभियांना अंतर्गत पुणे जिल्हा पातळीवरील तसेच राज्य पातळीवरील प्रथम पुरस्कारामार्फत  १५ लाख रुपयांचे पारितोषिक प्राप्त झाले आहे.आज पर्यंत गावाला पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा साने गुरुजी स्वच्छ शाळा पुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्ती पुरस्कार, आबासाहेब खेडकर पुरस्कार, पर्यावरण संतुलित ग्राम पुरस्कार, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार  आदीच्या माध्यमातून तब्बल २२ लाख रुपये मिळालेले आहेत.
 पिंपळगावच्या श्री.मुक्तादेवी यात्रोत्सव व महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून या वेबसाईटचे गावचे उद्योगपती मा.श्री. दत्ताशेठ बबनराव बांगर, पुणे जिल्हा परिषद सदस्य मा.श्री.मथाजी पोखरकर, मा.श्री.राजेश मधुकर पोखरकर, मा.श्री.बाबुराव दादा बांगर, मा.श्री.टी.के.बांगर, गावचे सरपंच मा.श्री. रोहिदास शंकर पोखरकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ग्रामविकास अधिकारी मा.श्री.रवींद्र खंडारे,ग्रामपंचायत सदस्य मा.श्री.सचिन बांगर, मा.श्री.रामचंद्र पोखरकर, मा.श्री.रोहिदास बन्सी पोखरकर, मा.सौ.बिल्कीश इनामदार, मा.श्री. बाळासाहेब पोखरकर, मा.श्री.प्रकाशशेठ बांगर, मा.श्री.संतोष पोखरकर आणि मा.श्री.शिवाजीशेठ पोखरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 
 

गुरुवार, २ मे, २०१३

भिर्र्र्रर्र........... आवाज दुमदुमला पिंपळगावच्या घाटात.....

१ मे २०१३ रोजी श्री मुक्तादेवी यात्रेच्या निमित्ताने बैलगाड्यांच्या भव्य शैर्याती आयोजित केल्या जातात. अलाउन्सर च्या आवाजाने व  लाउड स्पीकर च्या साथीने संपूर्ण आसमंत दणाणून उठतो......याच यात्रेच्या काही छायाचित्रे सविनय सादर.............
 
 
 

श्री.मुक्तादेवी मंदिराचे रंगकाम......

१ मे  २०१३ ला श्री. मुक्तादेवी यात्रा उत्सव आहे. त्या निमित्ताने पिंपळगाव खडकी मधील ब्राम्हणाच्या बेटावरील या मुक्तादेवी मंदिराचे विलोभनीय रंगकाम करण्याचे चालू आहे.

        गाव आता झपाटले आहे. विकासासाठी.... पिंपळगावच्या समृद्धीसाठी......
 

स्मशानभूमीत व गावांतर्गत उर्वरित रस्त्यांचे कॉक्रीटीकरण सुरु झाले.....

                    गावाला राज्य पातळीवरील संत गाडगेबाबा व संत तुकाडोजीबाबा ग्रामस्वच्छता अभियांना अंतर्गत ७ जिल्ह्यांमधून गावाने महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्यानंतर ग्रामपंचायत पिंपळगाव खडकी ने शांत न बसता.... स्मशानभूमीत व गावांतर्गत उर्वरित रस्त्यांचे कॉक्रीटीकरण सुरु केले त्याच बरोबर स्मष्ण भूमीच्या सुशोभिकारनामध्येही  ठोस पावले उचलली आहेत त्या प्रांगीची हि छायाचित्रे.....