बुधवार, २८ नोव्हेंबर, २०१२

नामदार मा. श्री. दिलीपरावजी वळसे पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा......

            आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते व महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष मा. नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या ५६ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पिंपळगाव मधील कार्यकर्त्यांनी मोठ मोठे फलक लावून शुभेच्छा दिल्या. तर मा. जि. प. सदस्य मा. मथाजी पोखरकर यांनी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रसिध्द समाजप्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख यांचे कीर्तन आयोजित केले. दरम्यान लकी ड्रॉ पद्धतीने विविध बक्षिषे वाटण्यात आली. त्यात प्रामुख्याने
५६ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वामनराव पै. यांचे विद्यार्थी मार्गदर्शन पुस्तक
५६ महिलांना सुंदर देवयानी पद्धतीच्या साड्या 
५६ जेष्ठ नागरिकांना छत्री वाटप.
५६ ग्रामस्थांना वामनराव पै. यांचे दोन मार्गदर्शनपर ग्रंथ

     त्याच बरोबर सदस्यांनी मा. प्रभाकर बांगर यांच्या नेतृत्वाखाली रक्तदानाचे आयोजन केले होते. त्यात पिंपळगाव ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
 


पिंपळगावमध्ये नामसंकीर्तन महायज्ञ सोहळ्याची सुरुवात...

                पिंपळगावामध्ये होणारा पांडुरंगाचा काकडा प्रसिध्द आहे. कोजागिरी पोर्णिमेनंतर या उत्सवास प्रारंभ होतो.तब्बल एक महिना ग्रामस्थांच्या हस्ते पांडुरंगाची महापुजा केली जाते. महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांची किर्तने होतात. ज्ञानेश्वरी पारायण सोहळा केला जातो. हरिपाठाचे स्तवन केले जाते.एकंदरित दिपावलीच्या काळात कार्तिक महिन्यात आयोजित केलेला हा काकडा भक्तिमय वातावरण निर्माण करतो.
                काकडयाची सांगता होण्याच्या शेवटच्या दोन दिवसात संगीत भजन स्पर्धेचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रातील नामवंत भजनी मंडळे सहभागी होतात. काल्याच्या दिवशी किर्तन होते. नंतर गावाला वाद्यांच्या गजरात प्रदिक्षणा घतली जाते व महाप्रसादाचा लाभ घेवुन काकडयाची सांगता होते.
नामसंकीर्तन महायज्ञ सोहळ्याबाबत सांगण्यासारखे बरच काही आहे. त्याची काही निवडक छायाचित्रे आपणासाठी सादर करीत आहे.
मंगळवार, २७ नोव्हेंबर, २०१२

पिंपळगाव मधील नवरात्रोत्सव साजरा झाला उत्साहात....

      ज्या प्रमाणे गणेशोत्सव पिंपळगावमध्ये उत्साहात साजरे केले जाते अगदी त्याच प्रमाणे नवरात्रामध्येही सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्राचीही बरीच मंडळे पिंपळगाव मध्ये आहेत. त्यात प्रामुख्याने सांगायची झालीच तर साई नवरात्रोत्सव (गव्हाळी मळा), पीरसाहेब नवरात्रोत्सव ( पाटलाचा मळा,वाडा), न्यू-मुक्तादेवी गणेश मंडळ (पिंपळगाव गावठाण, श्रीराम चौक) आदी प्रमुख मंडळांनी नवरात्रोत्सवामध्ये विशेष कामगिरी बजावली.
             नवरात्रोत्सवामध्ये सर्वात प्रसिद्ध बाब म्हणजे दांडिया. तब्बल ११ ते १२ वाजेपर्यंत तुफान गर्दीमध्ये दांडिया खेळली जाते. त्याची काही क्षणचित्रे येथे नमूद करीत आहे.