शुक्रवार, ३१ जानेवारी, २०१४
दोन उमद्या नेतृत्वाची दखल घेतली सह्याद्री वाहिनीने...
पिंपळगाव खडकीला सुजलाम सुफलाम करून प्रगतीच्या दिशेवर मार्गक्रमण करून देणारे जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. मथाजी पोखरकर तसेच पिंपळगावचे ग्रामविकास अधिकारी मा. श्री. रवींद्र खंडारे भाऊसाहेब यांची सह्याद्री वाहिनीवर मुलाखत घेण्यात आली.
शुक्रवार, २४ जानेवारी, २०१४
शुक्रवार, १० जानेवारी, २०१४
संकल्प नवीन वर्षाचा २०१४ साल कसे घालवायचे?
मी बांगर वनाजी बजरंग
आपल्याला
नम्र विनंती द्वारे आज्ञा देतो कि आपल्या महाराष्ट्रात परवा तारीख ०१/०१/२०१४ वार बुधवार या दिवसापासून नवीन वर्षापासून ,नवीन संकल्प करावयाचा आहे
१.नवीन वर्षात प्रत्येकाने इतरांबरोबर प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करावयाचा आहे.
२.व्यसनांपासून दूर राहा
३.नम्रता ,धैर्य ,संयम ,चिकाटी या गुणांची कास धरा
४.आपल्याला महाराष्ट्रात दारू निर्मिती बंद कायदा
व दारू विक्री बंद कायदा आणावयाचा आहे त्यासाठी
तरुण पिढीने प्रयत्न करावयाचा आहे ,सध्या आपल्या राज्यात व्यसनांचे प्रमाण खूपच वाढले आहे ,कित्येक
लोकांचे प्रपंच धुळीला मिळाले आहेत .दारू पिणाऱ्या
माणसांपासून व दारू विकणाऱ्या दुकानांपासून समाजाचे आरोग्य धोक्यात आले आहे. महाराष्ट्रातील आपल्या भगिनींना या गोष्टींचा फार त्रास होत आहे . तरी सर्व देशप्रेमी नागरिकांनी हि गोष्ट ध्यानात घ्या .
५.मी ही गोष्ट आपल्याला का सांगत आहे ?
तर या देशातील प्रत्येक व्यक्ती
हि आपली भाऊ -बहिण आहे. नव्हे नव्हे तर ती
आपल्या कुटुंबातील सदस्य आहे ,या देशात कुणीही परका नाही हि भावना आपल्या मनांत सतत जागृत पाहिजे .आणि जे
खरोखरच परके आहेत त्यांचा सुद्धा बंदोबस्त करावयाचा आहे
६.दिनांक ०१/०१/२०१४ पासुन प्रत्येक व्यक्तीने छ. शिवाजी महाराजांसारखे वागावयाचे आहे कारण आपण या देशाचे मालक आहोत .
७. हे पत्र वाचणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने किमान १०
मित्रांना हे पत्र ई-मेल करून पाठवायचे आहे
धन्यवाद
जय हिंद,जय महाराष्ट्र !
आपला भाऊ
श्री वनाजी बजरंग बांगर (बी.टेक)
मु /पो -पिंपळगाव (खडकी) ता.आंबेगाव जि .पुणे पिन ४१०५०३ मो .९९२२५६३०८५
"लवकरच पिंपळगावच्या बातम्या मी अपडेट करेल",वनाजी बांगर
ता .०१/०१/२०१४
श्री .बांगर वनाजी बजरंग
मु /पो .-पिंपळगाव (खडकी)
ता .-आंबेगाव जि .-पूना
पिन -४१०५०३
प्रिय मित्रांनो
,
सप्रेम नमस्कार
आपल्याला महाराष्ट्रात ५०,०००
तरुण घडवायचे आहेत ,कि जे पुढील काळामध्ये
म्हणजे सन २०१३ नंतर (आजपासून) समाजाला दिशा देण्याचे व मार्ग
दाखविण्याचे कार्य करू शकतात .मुलगा शिकला
अभियंता किंवा डॉक्टर किंवा पदवीधारक झाला
म्हणजे मुलगा घडला असे नाही तर त्याला जीवन म्हणजे काय ? जीवनात
कोणती गोष्ट महत्वाची आहे ?आपली कर्तव्ये काय ?हे माहित नसते .तसेच
१.आदर्श नागरिक कसे बनायचे .
२.जीवनात जी व्यक्ती महात्मा
बनले आहेत त्यांच्या जवळ कोणते विशेष गुण होते .त्यांचे अधिष्ठान काय होते
.त्यांची विचारसरणी कशी आहे .त्यांच्या मनांत सागरा ईतका प्रेमाचा झरा कसा उत्पन्न
होतो या गोष्टी आपणांस समजत नाहीत
३.आता शिकलेली बहुतेक मुले आई -वडिलांकडे लक्ष्य देत नाहीत ,भ्रष्ट्राचार करतात ,मनावर ताबा नसतो ,गैरमार्गाने वागतात हे असे का घडते
४.या सर्व गोष्टीचे मुलांना मार्गदर्शन करायचे आहे
५.महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक मुलगा मला छत्रपती
शिवाजी महाराज ,आदरणीय सचिन तेंडूलकर ,सावित्रीबाई
फुले , कर्मवीर भाऊराव
पाटील ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडवायचे आहे .हे शिवधनुष्य आता मीच हाती घेतले आहे
आपला बंधू
श्री . वनाजी बांगर
मो .9922563085
बुधवार, २१ ऑगस्ट, २०१३
पिंपळगाव मध्ये नागपंचमी उत्सवाबाबत
नागोबाला भाऊ मानणा - या मराठी महिलांचं नागपंचमीशी जिव्हाळ्याचं नातं. या सणाच्या निमित्ताने येणारे चार विसाव्याचे क्षण तिच्या आयुष्यात आनंद फुलवतात. लोकगीतांमधून या भावना उत्कटतेने उमटलेल्या दिसतात.
........
श्रावण श्रावण मास हा सणांचा राजा म्हणून गणला जातो. श्रावणाने सगळ्यात कठोर तप केल्याने जास्तीतजास्त व्रतवैकल्यं आणि सण याच मासात साजरी केली जातील असा वर त्याला मिळाल्याचं सांगितलं जातं. खरोखरच श्रावणात अनेकविध सण-उत्सव साजरे करताना व्रतांचं पालनही केलं जातं. त्यामुळेच श्रावणमासाशी स्त्रियांचं जिव्हाळ्याचं नातं असतं.
श्रावण शुद्ध पंचमीला येणारा नागपंचमीचा सण आजही ग्रामीण स्त्रियांच्या दृष्टीने महत्त्वाचा सण मानला जातो. कारण या सणाच्या निमित्ताने सासुरवाशिणी माहेरी आलेल्या असतात. पंचमीच्या आदल्या दिवशी माहेरच्यांना सुखी ठेवण्यासाठी या माहेरवाशिणी व्रत ठेवतात. स्त्रियांच्या मनातील भावना आपल्याला लोकगीतांच्या माध्यमातून अनुभवता येतात. नागपंचमीच्या निमित्ताने गावातल्या माहेरवाशिणी ठराविक चक्रातून फिरणाऱ्या स्त्री मनाला दिलासा तर मिळतोच पण भावनांना वाटही मिळते.
माहेरी जाण्यासाठी आपल्याला बोलावणं येईल म्हणून मग सासुरवाशीण आतूरतेने वाट पाहत असते. ती म्हणते,
सणामंदी सण नागपंचमी खेळायची
वाट पाहते बोलायाची
एकादस पारणं बहीण धरते भावाचं
नागोबा देवाचं काय होईल जिवाचं
पंचमीच्या दिवशी नागोबाला पऊतं
सोड कुणब्या आऊत
पंचमीचा सण नागाला दूध लाह्या
आऊक्ष मागूया भाऊराया
नागपंचमीच्या दिवशी माहेरी आलेल्या स्त्रियांचं मन आनंदून जातं. त्या दिवशी पूजेची जय्यत तयारी करतात.
सरावण मासामंदी आला पंचमीचा सण
आनंदलं मन्ह अन
सारविल्या भिंतीवरी काढीला नागोबा
दूध लाह्या वाहू त्याला
त्या दिवशी स्त्रिया पाटावर चंदनाने नागाची चित्रं काढतात. काही ठिकाणी भिंतीवर शेणाने चित्रं काढली जातात. ही तयारी सुरू असताना तिचं मन म्हणत असतं,
पंचमीचा सण
फुलांचे हार गजरे
दह्या दुधाच्या वाट्या
दारामंदी पूजीते
नागोबा नटवा
दुरडी लाह्याची पाठवा
जाईजुईची फुलं
सये नागोबाची मुलं
नागोबा मी पूजीला
पाठी भाऊ मागितला
या दिवशी स्त्रिया नव्या साड्या नेसून, मुली परकर पोलकं घालून नटूनथटून तयार होतात. मग सगळ्या जणी गाणी गात एकत्र वारुळाला जायला निघतात.
चल ग सये वारुळाला, नागोबाला पूजायला
हळदकुंकू वाहायाला ताज्या लाह्या वेचायाला
जमूनिया साऱ्या जणी जाऊ बाई न्हवणा
जिथं पाय ठेवू बाई तिथं उठल दवणा
नागाला भाऊ मानून स्त्रिया उपवास करतात, पूजा करतात, मग या भावाचं किती कौतुक करू असे त्यांना होते.
नागोबा संगट पूजा केली नागिणीची
वाटी देत फुटाण्याची
पंचमीच्या दिवशी घाली ना वेणीफणी
पूजीला नागफणी
पंचमीच्या दिवशी काजळ घालिना
नाग येणार पाव्हणा
पंचमीच्या दिवशी निवद उकडीचा
नागोबाचा आवडीचा
एका गीतात पंचमीच्या दिवशी वारुळाला जाताना नवी साडी हवी म्हणून विठ्ठलाकडे हट्ट धरून बसलेल्या रुक्मिणीचं चित्र आहे. एकूण स्त्रीच्या स्वभावधर्मानुसार नटण्याची नवीन साडीची आवड देवतांनाही असावी.
अशी वसली पंढरी
वाळवंटी पुंडलिक हरी
तिथून पुंडलिक झडकिला
गेला रुक्मिणीच्या वाड्या
रुकमाबाई गं सुंदर
जाऊ वारुळा गुजरी
तिथून रुक्मिणी झडकिली ऱ्हाईबाईच्या वाड्या गेली...
नाग, साप शेतकऱ्याचा मित्र असतो. त्यामुळे त्याच्याविषयीचा आदर भाव ही या स्त्रिया व्यक्त करतात आणि त्याला भूतदया दाखवावी, असा संदेश देतात.
नागपंचमीला, नागा चंदनाचे गंध।
तुटती भावबंध, पुजणाऱ्यांचे।।
नागपंचमीला, नागाला घालू दूध।।
होईल बुद्धी शुद्ध, नागकृपे।।
नागपंचमीला, नको चिरू भाजीपाला।
दया शिकवू हाताला, आज सये।।
ही लोकगीतं म्हणजे मराठी भाषेचं स्त्रीधन आहे. ग्रामीण भागातील सामान्य स्त्रियांच्या मनातील विविध भावभावनांचा आविष्कार या गीतांमधून अनुभवता येतो. सामान्य स्त्रियांच्या साध्या, सरळ भावनांमुळे या गीतांना वेगळाच साज चढतो. सहजसुंदर ओघवती शैली, पारदर्शकता, साधं मन, सरळता, स्वाभाविकता हे या गाण्यांचं वैशिष्ट्य. या गीतांमधून त्या त्या काळचं लोकजीवनही अनुभवता येतं. आधुनिक जीवनशैली स्वीकारलेल्या शहरवासीयांकडून हे लोकवाङ्मय दुर्लक्षिलं गेलं आहे, पण हा महाराष्ट्राचा, मराठी मातीचा आणि मराठी माणसाचा समृद्ध वारसा आहे हे विसरता कामा नये.

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)