मंगळवार, ८ एप्रिल, २०१४

श्रीराम जन्मोत्सवानिमित्त भव्य मिरवणूक...


आज खऱ्या अर्थाने गावातील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर आपल्या संस्कृतीचे उतराई होण्यासाठी कटिबद्ध होत आहे. हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान ने श्रीराम जन्मोत्सवाचे औचित्य साधून रामलीला व छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेमध्ये मिरवणूक काढली. अतिशय उत्साहात हि मिरवणूक पार पडली त्या दरम्यानचे काही क्षणचित्रे....





रविवार, ६ एप्रिल, २०१४

रामनवमीची तयारी...


भारत पर्वों का देश है, रामनवमी ऐसा ही एक पर्व है। चैत्र मास के शुक्ल पक्ष की प्रतिपदा को प्रतिवर्ष नये विक्रम सवंत्सर का प्रारंभ होता है और उसके आठ दिन बाद ही चैत्र शुक्ल पक्ष की नवमी को एक पर्व राम जन्मोत्सव का जिसे रामनवमी के नाम से जाना जाता है, समस्त देश में मनाया जाता है। इस देश की राम और कृष्ण दो ऐसी महिमाशाली विभूतियाँ रही हैं जिनका अमिट प्रभाव समूचे भारत के जनमानस पर सदियों से अनवरत चला आ रहा है। रामनवमी, भगवान राम की स्‍मृति को समर्पित है। राम सदाचार के प्रतीक हैं, और इन्हें "मर्यादा पुरूषोतम" कहा जाता है। रामनवमी को राम के जन्‍मदिन की स्‍मृति में मनाया जाता है। राम को भगवान विष्णु का अवतार माना जाता है, जो पृथ्वीपर अजेय रावण (मनुष्‍य रूप में असुर राजा) से युद्ध लड़ने के लिए आए। राम राज्‍य (राम का शासन) शांति व समृद्धि की अवधि का पर्यायवाची बन गया है। रामनवमी के दिन, श्रद्धालु बड़ी संख्‍या में उनके जन्‍मोत्‍सव को मनाने के लिए राम जी की मूर्तियों को पालने में झुलाते हैं। इस महान राजा की काव्‍य तुलसी रामायण में राम की कहानी का वर्णन है|

रामनवमी मध्ये गावामध्ये गुढीपाडव्याच्या दिवसापासून रामनवमी पर्यंत नामसंकीर्तन सप्ताह असतो. यामध्ये विविध किर्तनांचा समावेश असतो. नऊ दिवस गावातील वातावरण अतिशय मनमोहक आणि रंजक होते. 
रामनवमीमध्ये अनेक मान्यवरांचा सहभाग असतो. गावातील अनेक दानशूर मंडळींची नोंद या बातमीमार्फत घेणार आहोत...
 रामनवमी जन्मोस्तव झाल्यानंतर संपूर्ण गावाला लापशी आणि बटाटा भाजी चा महाप्रसाद असतो. दुपारच्या रणरणत्या उन्हात भक्तांची सोय व्हावी म्हणून भव्य दिव्य मंडप घातला जातो त्या साठीचे दानशूर देणगीदार :
१. श्री. भरत तुकाराम पोखरकर (बालकल्याण आयुक्त मुंबई)
२. श्री. सुदाम सावळेराम पोखरकर (सी.ए.पुणे.)
३. श्री. प्रकाशशेठ बबन बांगर (चेअरमन, कमलाजादेवी पतसंस्था)
४.श्री. श्रीहरी महादेव बांगर (जेटीओ नारायणगाव )
५. श्री. जितेंद्र चिमाजी बांगर (जोगेश्वरी मिल्क )
६. श्री. कोंडीभाऊ गणपत पोखरकर (मार्केटिंग मनेजर पराग डेअरी मुंबई)
७. श्री. संजय शांताराम बांगर (पी.एस.आय. ठाणे शहर)
८. श्री. बळीराम गजानन पोखरकर (मनेजर पुणे.)
९. श्री. बाबुराव गंगाराम बांगर (भाजीपाल्याचे व्यापारी- वाशी)
१०. श्री. सीताराम साबाजी पोखरकर (अध्यक्ष, नवी मुंबई मित्र मंडळ)
११. श्री. पोपट बबन पोखरकर (कृषी अधिकारी शरद सह.बँक )
१२. श्री. अरुण सहादू पोखरकर (संचालक, कमलजादेवी पतसंस्था )
१३. श्री. सचिन नामदेव बांगर (आदिराज बिल्डर्स & डेव्हलपर्स मंचर)
१४.श्री. राजेंद्र भगवान पोखरकर (संचालक कमलजादेवी पतसंस्था )
१५. श्री. संदीप दामोदर पोखरकर (श्री. गणेश जनरल स्टोअर्स)
१६. श्री. संभाजी महादेव इंदोरे (पशुवैद्यकीय डॉक्टर)
१७. श्री. मिनिनाथ सावळेराम राक्षे (श्रीराम केबल नेटवर्क)
१८. श्री. पंकज बाळू पोखरकर (जय श्रीराम दुध संकलन)
१९. श्री. अरुण शंकरराव चव्हाण (भाग्यश्री आईस्क्रीम & कोल्ड्रिंक)
२०. श्री. शंकर संभाजी पोखरकर (के.पी.डेकोरेटर्स, पुणे)
२१. श्री. उत्तम तेज्जू पोखरकर (सिद्धेश्वर स्पीकर्स)
२२. श्री. शाम बबन गावडे (मार्केटिंग मनेजर जोगेश्वरी ट्रेडर्स )
२३. श्री. हनुमंत गोविंद बांगर (चेअरमन शंभू महादेव दुध संस्था)

पिण्याचा पाण्याची व्यवस्था :-
श्री. गणेश रखमाजी अरगडे (जय गणेश मिल्क)

संपूर्ण राम मंदिरास भव्य -दिव्य फुलांचे डेकोरेशन :-
श्री.शिवरामशेठ लक्ष्मण बांगर (फुलवाले)
   

रविवार, ३० मार्च, २०१४

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छ्या...!!!!


ब्रह्म्हदेवाने हे जग चैत्र शुल्क प्रतिपदेच्या दिवशी निर्माण केले असे पुराणात सांगितलेले आहे. त्यामुळे विश्वाचा वाढदिवस या गुढीपाडव्याला साजरा केला जातो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील एक सण मानला जातो. या दिवसासंबंधी विविध आख्यायिका प्रचलित आहेत. त्या अशा :

१. शालिवाहन शकासंबंधी दोन कथा सांगितल्या जातात. शालिवाहन नावाच्या एका कुंभाराने मातीचे सैन्य तयार करून त्यांच्यात जीव भरला आणि त्यांच्या मदतीने शत्रूचा पाडाव केला. या विजयाप्रीत्यर्थ शालिवाहन नृपशक सुरू झाला. म्हणजे मातीच्या गोळ्याप्रमाणे थंड, पराक्रमहीन, दुर्बल, निर्जीव झालेल्या समाजामध्ये त्याने चैतन्य निर्माण केले असावे. समाजात स्वाभिमान, अस्मिता जागृत केली असावी.

दुसऱ्या कथेप्रमाणे शालिवाहन राजाने अत्याचारी शक लोकांचा पराभव करून त्यांच्या जाचातून जनतेची मुक्तता केली. या विजयाप्रीत्यर्थ चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून शालिवाहन शकाला प्रारंभ झाला. या वर्षी शालिवाहन शक १९३० चा प्रारंभ होत आहे. ज्यांनी विजय मिळविला तो शालिवाहन आणि ज्यांच्यावर विजय मिळविला ते 'शक' असा दोघांचाही अंतर्भाव 'शालिवाहन शक' यामध्ये करण्यात येतो.

२. वसू नावाचा राजा तपश्चर्या करून मनुजैंद झाला. स्वर्गातील अमरेंदाने चैत्र शुक्ल प्रतिपदेला वस्त्रालंकार देऊन त्याचा गौरव केला म्हणून हा दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा केला जातो.

३. भगवान श्री विष्णूंनी प्रभु रामचंदाचा अवतार घेऊन रावणासह दुष्ट राक्षसांचा पराभव केला. रावणाला ठार मारले. त्यानंतर प्रभु रामचंदानी चैत्र शुल्क प्रतिपदेच्या दिवशी अयोध्येत प्रवेश केला. त्यावेळी जनतेने गुढ्या तोरणे उभारून त्यांचे स्वागत केले. तेव्हापासून दर चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढ्या तोरणे उभारून आनंदाचा विजयोत्सव दिन साजरा होऊ लागला.
गुढीपाडवा असा साजरा करावा!

गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराची व परिसराची स्वच्छता करावी. अंगास सुवासिक तेल लावून अभ्यंगस्नान करावे. नवीन वस्त्रे परिधान करावीत. दरवाजासमोर रांगोळी काढावी. देवांची पूजा करावी. घराच्या दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे. वेळूची (बांबूची) काठी घेऊन ती स्वच्छ धुवून तिच्या टोकाला तांबडे वस्त्र, फुलांची माळ, साखरपाकाची माळ घालून त्यावर एक लोटी उपडी ठेवावी. अशारितीने तयार केलेली गुढी, दारासमोर रांगोळी घालून उभी करावी. या गुढीस पूजा करून कडूनिंबाची कोवळी पाने घेऊन त्यात जिरे, मिरी, हिंग, सैंधव, मीठ व ओवा इत्यादी घालून ते मिश्रण चांगले वाटावे आणि घरातील सर्वांनी थोडे थोडे खावे. पंचपक्वान्नाचे भोजन करून तो दिवस आनंदात घालवावा. या दिवशी चांगल्या कामाचा शुभारंभ करावा.

अमेरिकेच्या नॅशनल सायन्स अकादमीने 'नीम : ए ट्री फॉर सॉल्विंग ग्लोबल प्रॉब्लेम्स' नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. कडूनिंबाचे फार महत्त्व आहे. म्हणूनच गुढीपाडव्याला कडूनिंब भक्षणाचे महत्त्व आहे.


निम्बस्तिक्त : कटू : पाकेलघु : शीतोह्यग्नि-वात-कृत।

ग्राही हृद्यो जयेत् पित्त-कफ-मेह-ज्वर-कृतीन्।।

कुष्ठ-कासारूपी हल्लास-श्ववथु-व्रणात्।

भूक न लागणे, उलट्या होणे, आम्लपित्त, कावीळ, मूळव्याध, पोटदुखी, पोटात जंत होणे, डोक्यात उवा होणे, वेगवेगळ्या प्रकारचे त्वचारोग, व्रण, जखमा, दाहरोग, विंचूदंश, सर्पदंश, अकाली केस पांढरे होणे, वेगवेगळ्या प्रकारचे ज्वर (ताप) मुखरोग, दातांचे आजार, नेत्रदोष, स्त्रियांचे आजार, सांधेदुखी इत्यादी आजारांवर कडूनिंब उपयुक्त आहे. मात्र तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच याचा उपयोग करावा. अति कडूनिंब सेवन आरोग्यास अपायकारक असते. जंतुनाशक म्हणूनही कडूनिंब उपयुक्त आहे.

पंचांगाचे महत्त्व

गुढीपाडव्यापासून, नवीन शालिवाहन शकवर्षारंभापासून नवीन पंचांगाची सुरुवात होते. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भादपद, आश्विन, कातिर्क, मार्गशीर्ष, पौष, माघ व फाल्गुन हे चांद-महिने एकामागोमाग येत असतात. भारतीय कालमापनात ऋतू व सण यांनी सांगड घातलेली आहे. त्यासाठी सौर व चांदपद्धतीचा मेळ घातलेला आहे. महिन्यांची नावे व आकाश यांचाही संबंध आहे. चैत्र महिन्यात चित्रा नक्षत्र रात्रीच्याप्रारंभी पूवेर्ला उगवून पहाटे पश्चिमेस मावळते. वैशाख महिन्यात विशाखा! ज्येष्ठात ज्येष्ठा! तसेच त्या महिन्यांच्या पौणिर्मेला चंद त्या त्या नक्षत्रापाशी असतो. म्हणजे चैत्र पौणिर्मेला चंद चित्रापाशी! जानेवारी-फेब्रुवारीचे तसे नसते.

कलियुगाची एकंदर ४ लक्ष ३२ हजार वर्षे आहेत. तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण या पाच अंगानी पंचांग बनते. इ.स.पूर्व १५०० वर्षांपासून तिथी प्रचारात आहेत. इ.स. पूर्व एकहजार वर्षांपासून वार प्रचारात आहेत. नक्षत्रेही इ.स.पूर्व १५०० वर्षांपासून प्रचारात आहेत. 'योग' हे पंचांगातील चौथे अंग इ.स. ७०० नंतरच प्रचारात आले. पाचवे अंग 'करवा' हे इ.स.पूर्व १५०० पासून प्रचारात आले. पंचांग म्हणजे आकाशाचे वेळापत्रक! वर्षभरातील खगोलीय घटनांचे वेळापत्रक पंचांगात असते. पंचांगे ही सूर्यसिद्धांत, ग्रहलाघव, करणकल्पकता या करणग्रंथांवरून तयार केली जात. सध्या पंचांगे ही संगणकावर तयार केली जातात. ती जास्त सूक्ष्म असतात.

सकाळ तनिष्का व्यासपीठ पिंपळगाव खडकी मध्ये स्थापन

सकाळ तनिष्का व्यासपीठ आज नववर्षाच्या मुहार्तावर पिंपळगाव खडकी येथे २० महिलांच्या उपस्थितीत पार पडले तेव्हा त्या महिलांना सकाळचे ज्येष्ठ पत्रकार मा.श्री. डी.के.वळसे पाटील तसेच जिल्हा परिषद सदस्य मा.श्री. मथाजी पांडुरंग पोखरकर यांनी संबोधित केले....







रविवार, १६ फेब्रुवारी, २०१४

श्रीराम दुध उत्पादक सह संस्थेमध्ये ग्रामस्थांची बैठक

१७ फेब्रुवारी २०१४ :
      उत्कृष्ट क्वालिटीचे दुध निर्मितीसाठी कोण-कोणती ठोस पाऊले उचलली पाहिजे याचे विचार-विनिमय करताना पिंपळगाव खडकी दुध उत्पादक गवळी....

रविवार, २ फेब्रुवारी, २०१४

राजा शिवछत्रपती मंडळाच्या वतीने गणेश जयंती उत्सव साजरा...

३ फेब्रुवारी २०१४ :

१९७५ सालापासून समाजसेवेचा वारसा चालू ठेवत राजा शिवछत्रपती तरुण मित्र मंडळाच्या वतीने गणेश जयंती उत्सवाचे आयोजन आज करण्यात आले. सकाळी : ७ :३० वाजता.गणेशाचा  अभिषेक करण्यात आला. तसेच स. १० ते ११.०० वाजता.  - श्रींच्या पादुकांची मिरवणूक काढण्यात आली.
त्यानंतर दु.१२.०० वाजता. : श्री. गणेशाची महाआरती संपन्न झाली. 
आता. सायंकाळी. ५ ते ७ च्या दरम्यान महाराष्ट्राचे प्रसिद्ध कीर्तनकार ताजुद्दीन महाराज शेख (औरंगाबाद) यांचे कीर्तन होईल. धन्यवाद !!!
www.swapnweb.co.in



जिल्हा परिषद औरंगाबाद जिल्ह्याचा अभ्यास दौरा

२ फेब्रु २०१४ :

महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन निर्मल भारत अभियान जिल्हा परिषद औरंगाबादच्या सौजन्याने सरपंच, ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, विस्तार अधिकारी अभियंता यांचा "अभ्यास दौरा" आपल्या गावामध्ये दाखल झाला तेव्हा आपल्या गावचे ग्राम विकासाधीकारी मा.श्री. रवींद्र खंडारे भाऊसाहेब मार्गदर्शन करताना....