शनिवार, २० एप्रिल, २०१३

रामनवमी उत्सव थाटामाटात साजरा....

दिनांक :१९ एप्रिल २०१३
पिंपळगावचे आराध्यदैवत असणारे प्रभू रामचंद्र यांच्या जन्मदिनी म्हणजेच रामनवमीच्या दिवशी पिंपळगाव ग्रामस्थांची अलोट गर्दी जमते.पिंपळगावची  मुंबईकर मंडळी, पुणेकर मंडळी आपली अत्यंत महत्वाची कामे बाजूला सारून या उत्सवामध्ये सहभागी होतात. याच उत्सवाचे काही महत्वाचे फोटो सविनय सादर करीत आहोत.


पिंपळगाव खडकी गावच्या प्रभू रामाच्या मंदिराचे व  मूर्तीचे  फोटो केलेली सजावट  
रामजन्माच्या कीर्तनास भाविकांची प्रचंड गर्दी
रामनवमी निमित्त प्रभू रामचंद्राच्या तब्बल ५०० किलो पेढा(१ किलो २००/- रु. तर ५०० *२००=१,००,०००/-(१ लाख) रुपये  )वाटला जातो. आणि कीर्तनानंतर देणग्या घेतल्या जातात शिवाय ४ मोठे टोप लापशी (२००० किलो ) आणि बटाट्याच्या भाजी महाप्रसाद म्हणून दिला जातो. तब्बल १०,००० लोकं जेवतील एवढा महाप्रसाद केला जातो.  

पिंपळगाव खडकी गावाला राजगुरुनगर ग्रामसेवक, विस्तार अधिकारी यांची भेट......

दिनांक : १८ एप्रिल २०१३

पिंपळगाव खडकी गावाला राजगुरुनगर ग्रामसेवक, विस्तार अधिकारी यांनी भेट देऊन गावाची पाहणी  केली. गावाने तयार केलेला पाणी व्यवस्थापनाचा प्रकल्प विशेष आवडला..... या कामातून विशेष प्रेरणा मिळाली हेही त्यांनी यावेळी नमूद केले. गावाची वेबसाईट बनविण्याची संकल्पना विशेष कौतुकस्पद वाटली....गावाच्या लोकसहभागातून पार पडलेली कामाचा आढावा पाहून मान्यवर थक्क झाले.
पिंपळगाव खडकी गावच्या वेबसाईट च्या माध्यमातून गावाबद्दलची माहिती घेताना. राजगुरुनगर ग्रामसेवक, विस्तार अधिकारी.....
 

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता कमिटीच्या स्वागतासाठी रांगोळीची आरस....

संत गाडगेबाबा व संत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत नाशिकची विभागीय समितीच्या स्वागतासाठी गावामध्ये सर्वत्र रांगोळी काढण्यात आली. या रंगोलींचे ग्रामपंचायत पिंपळगाव खडकीच्या वतीने परीक्षण करण्यात आले व रांगोळीला क्रमांक देण्यात आले.
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान
रांगोळी स्पर्धा – दि.13/4/2013



 

 
अ.नं.
स्पर्धकाचे नाव
१.
स्वप्नल बबन शिंदे
२.
प्रतिमा शिवाजी बांगर
३.
जि.प.प्राथमिक शाळा
४.
एकता नगर बचत गट, पिंपळगाव (खडकी)
५.
रत्नप्रभा पोखरकर व सुवर्णा पोखरकर
६.
भाग्यश्री अरुण चव्हाण
द्वितीय क्रमांक
अ.नं.
स्पर्धकाचे नाव
१.
सारिका किशोर भागवत
२.
पुष्पा लक्ष्मण बांगर
३.
मुक्ता शिवराम बांगर
४.
जनाबाई रवींद्र पोखरकर
५.
साक्षी नवनाथ बांगर
तृतीय क्रमांक
१.
स्वरा संजय पोखरकर (हरिकृष्ण हॉटेल)
२.
आशा ज्ञानेश्वर गोसावी
३.
मयूर राजेंद्र राजगुरू
४.
अलिशा रशीद इनामदार
५.
आर्या, शिवानी गोसावी
६.
रामदास गंगाराम बांगर
चतुर्थ क्रमांक
१.
सुशीला जैन
२.
प्रतीक्षा शंकर साळुंके
३.
पूनम धनंजय कोऱ्हाळे
४.
पूजा सुर्यकांत बावणे
५.
शकुंतला तुकाराम वाघमारे
पाचवा क्रमांक
१.
मिता बाणखेले
२.
अनिता पोखरकर
३.
फिजा नजीर इनामदार
४.
अदिती प्रमोद बांगर
५.
सुनिता रामदास मोरे
६.
पल्लवी गणेश वाघ
उत्तेजनार्थ बक्षीस
१.
हिंदुकृपा हॉटेल (निलेश बबन बांगर)
२.
श्रीराम व मशीद मागील रांगोळी
३.
विश्वनाथ साळुंके
४.
वर्षा आस्तिक वाघमारे
५.
सुमन राजेंद्र वाघ
६.
नेहा बबुशा वाघ
 
संतोष गोविंद पोखरकर
 
अपर्णा शिंदे
 
निकिता किसान पोखरकर
 
मनीष अविनाश बांगर
 
साक्षी जगदीश वाघमारे
 
ज्योती पंकज बारवकर

संत गाडगेबाबा व संत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत नाशिकच्या विभागीय समितीची भेट.....

संत गाडगेबाबा व संत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत नाशिकच्या विभागीय समितीने पिंपळगाव खडकीला दुपारी:२:०० वाजता भेट दिली. पिंपळगाव खडकी मधील रस्ते, सार्वजनिक वास्तू, शौचालये, स्मशानभूमी,आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इ. बाबींची कसून पाहणी केली.
        पिंपळगाव खडकी ची वेबसाईट पहिली असता गावपातळीवर तंत्रज्ञान आणल्याबद्दलच्या कामाचे कौतुक केले. या पाहणी दरम्यानचे फोटो खालील प्रमाणे:
 
 
 

सोमवार, ४ मार्च, २०१३

निर्मल भारत अभियान पुणे जिल्हा परिषदेला पाठवलेला रिपोर्ट

पिंपळगाव तर्फे महाळुंगे, ता-आंबेगाव, जिल्हा -पुणे.
गावाचे वर्णन :-
                 पिंपळगाव तर्फे महाळुंगे हे गाव मंचर पासुन 5 कि.मी पुर्वेकडे वसलेले असुन गावाला पश्चिम-पुर्व वाहणारी घोडनदी लाभलेली आहे. शेजारील गावाला लाभलेल्या भव्य तटामुळे नदीचा परिसर शोभिवंत वाटतो.
                गावची लोकसंख्या किमान सहा हजाराच्या आसपास आहे. गावचे क्षेत्रफळ 696.81 हेक्टर पैकी गायरान 34.62 हेक्टर व लागवडीलायक क्षेत्र 602.38 हेक्टर असुन, ग्रामदैवत मुक्तादेवी मंदीर, श्रीराम मंदीर, श्री हनुमान मंदीर, आणि श्री कमलजादेवी अशी अनेक देव-देवतांची मंदीरे आहेत. गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत सन 1953 साली स्थापन झाली. गावाला आजपर्यंत अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत.गावाला आजतागायत विविध पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने  जाने-२०१३ मध्ये प्राप्त झालेला २०११-१२ चा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा पुणे जिल्ह्यातील प्रथम पुरस्कार. या पुरस्कारामध्ये गावाला पाच लाख रुपयाचे पारितोषिक मंजूर  झाले. त्याचप्रमाणे इतरही काही पुरस्कार खालीलप्रमाणे :
१.संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात तालुकास्तरावर प्रथम (सन २००८-२००९)  
२. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानांतर्गत आबासाहेब खेडकर पुरस्कार पुणे जिल्हयामध्ये तृतिय (सन २००८-२००९) 
३. संत गाडगेबाबा ग्रामस्वछता अभियान पुणे जिल्हयात तृतीय (सन २०१०-११)  
४. संत गाडगेबाबा अभियाना अंतर्गत साने गुरूजी आदर्श स्वच्छ शाळा म्हणुन प्रथम (सन २०१०-११)   
५. पुणे जिल्हा परिषदेचा आदर्शशाळा म्हणुन जिल्हयात प्रथम (सन २०११-१२)  
६. महात्मा गांधी तंटामुक्त अभिमाना अंतर्गत पाच लक्ष रूपयाचे पारितोषिक (सन २०१०-११)  
७. पुणे जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या वतीने २०१२ या वर्षाचा "आदर्श ग्रामसेवक पुरस्कार" मा.रविंद्र खंडारे यांना प्राप्त झाला.

यापूर्वीची गावाची परिस्थिती :-
                तसं पाहायला गेलं तर घोडनदी पाणी लाभल्यामुळे बहुतांशी परिसर पाण्याखाली आहे. त्यामुळे बागायती जमिनी आहेत. परंतु स्वच्छतेच्या बाबत गावामध्ये निराशाजनक परिस्थिती होती. उघडी गटारे, शौंचाला उघड्यावर बसणे, नदीमध्ये गावातील सांडपाणी सोडणे, देऊळ, शाळा, वाचनालय, दुध डेअरीच्या मागील बाजूस लोकं लघुशंका करत. सर्वात जास्त घाण ही नदी किनाऱ्यावर, स्मशानभूमीच्या ठिकाणी असायची. त्यामुळे साहजिकच तेथील जागा मच्छर व घाणीच्या वासाने भरलेली असायची. त्यामुळे गावामध्ये आजारी व्यक्तींची संख्या जास्त असायची. गावात आरोग्य केंद्र होते. पण लोकं जनजागृतीच्या अभावामुळे हि लोकं त्या आरोग्यकेंद्रात क्वचितच जात असत. पाण्याची टाकी आता पडायला आली होती. मराठी शाळेची वाताहत झाली होती.
मथाजी पोखरकर सरपंच पदावर आल्यानंतर गावातील एक-एक काम हळू हळू मार्गी लागायला लागले. नवीन पाण्याची टाकी झाली, बंधिस्त गटारे झाली, अंतर्गत रस्त्यांचे कॉक्रीटीकरण झाले, ग्रामपंचायतीची नवीन इमारत झाली, दोन वर्षात ३ मंदिरे बांधली गेली, सार्वजनिक  शौचालयाचे बांधकाम करण्यात आले.  विशेष म्हणजे स्मशानभूमीचा परिसर जो सगळ्यात घाण  समजला जायचा त्याची इतकी डेव्हलपमेंट केली की आणखी काही  लाख गुंतवले की पर्यटन स्थळच होईल. गावाला सभागृह झाले. गावात ३ अत्याधुनिक तंत्राने सज्ज संगणक प्रयोगशाळा आहेत.मराठी शाळेमध्ये लोकसहभागातून शिवचित्र सृष्टीने सज्ज भव्य सभागृह बांधण्यात आले. पिंपळगाव ते पिंपळगाव फाटा रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण झाले, मुक्ताबाई पूल  अशी अनेक विकासकामे गावात झाली.
२००६-०७ नंतर गावाने शासनाच्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी व्हायला सुरुवात केली. त्यामध्ये प्रामुख्याने निर्मल ग्राम पुरस्कार, पर्यावरण संतुलित ग्राम पुरस्कार, इ.आज गावात १००% बंधिस्त गटारे आहेत, १००% हगणदारी मुक्त आहे, त्याचप्रमाणे सांडपाण्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन केले आहे. तरीही गावामध्ये अजून बरीच डेव्हलपमेंट करणे बाकी आहे. 
गावाच्या चतुःसीमा 
पुर्वेस :- निरगुडसर
पश्चिमेस:- चांडोली, मंचर
उत्तरेस:- खडकी
दक्षिणेस:- अवसरी खुर्द
: येण्या-जाण्याचे मार्ग :
मंचरमार्गे ->पिराचा मळा->पिंपळगाव तर्फे महाळुंगे
अवसरीमार्गे-> लिंबाचा मळा->पिंपळगाव तर्फे महाळुंगे
खडकीमार्गे-> पुल ओलांडुन->पिंपळगाव तर्फे महाळुंगे
निरगुडसरमार्गे-> गव्हाळीमळा->पिंपळगाव तर्फे महाळुंगे

               
गावाची तालुक्यातील पहिली अत्याधुनिक वेबसाईट :-
                तंत्रज्ञानामध्येही गावाने मागे न राहता तब्बल ३० हजार रुपये खर्च करून गावाची मराठीतून वेबसाईट तयार केली आहे. त्यामध्ये गावाचे ऑनलाइन बातमीपत्र ही आहे, गावचा उपग्रहावरून  नकाशाही आहे. ग्रामपंचायतीची कामकाज, विकासकामे, फोटो ही वेबसाईटवर आहेत. गावाला भेट दिलेल्या मान्यवरांची तसेच इतर बाबीची व्हिडीओ सुद्धा आहे. ही वेबसाईट पाहण्यासाठी खालील पत्ता गुगल वर टाईप  करा.
www.ambegaon.com  किंवा  http://www.ambegaon.com/village/pimpalgaonkh.html किंवा pimpalgaonkh.com

रविवार, ३ मार्च, २०१३

आता महत्वाच्या व्हिडिओ सुद्धा दिसणार पिंपळगाव (खडकी) या वेबसाईटवर ....

पिंपळगाव खडकीचे महत्वाचे व्हिडीओ आता तुम्ही आंबेगाव डॉट कॉमच्या वेबसाईट वरून पाहू शकता.
अवश्य भेट द्या : http://ambegaon.com/village/pimpalgaonkh/video.html

पिंपळगाव (खडकी ) वेबसाईटची मान्यवरांनी केली पाहणी.....

फिनलंड देशाच्या अधिकाऱ्यांना पिंपळगाव (ख )वेबसाईटमागील भूमिका सांगताना वैभव पोखरकर
 
संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान समितीने पिंपळगाव (ख) वेबसाईटची सविस्तर माहिती जाणून घेतली वेबसाईट बाबत सांगताना मा. श्री. माथाजी पोखरकर 
पुणे ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार श्री. डी. के. वळसे सर आंबेगाव.कॉम ची पाहणी करताना....
आंबेगाव तालुका राष्ट्रवादी पक्षाचे कार्याध्यक्ष मा. श्री. बाबुराव दादा बांगर वेबसाईट ची पाहणी करताना....


पुणे जिल्ह्याचे सी.ओ. मा.श्री. उत्तमराव करपे  वेबसाईट ची पाहणी करताना....
महानंदा दुध संघाच्या अध्यक्षा सौ. वैशालीताई नागवडे यांनीही आंबेगाव.कॉम व पिंपळगाव (खडकी) या वेबसैटची पाहणी केली.

आंबेगाव डॉट कॉम वेबसाईट Visit:- ww.ambegaon.com

पिंपळगाव (ख.) गावाची वेबसाईट